D. K. Shivakumar: संकटमोचक' डी.के शिवकुमारांनी महाराष्ट्रात विलासरावांचे देखील वाचवलेलं सरकार

D. K. Shivakumar Congress crisis solver saved Vilasrao Deshmukh
 government in maharashtra
D. K. Shivakumar Congress crisis solver saved Vilasrao Deshmukh government in maharashtraesakal

D. K. Shivakumar: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत असे अनेक नेते चर्चेत होते, पण सर्वात जास्त चर्चेत असलेले एक नाव म्हणजे डीके शिवकुमार. डी.के. शिवकुमार सध्या कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे नेते आहेत.

D. K. Shivakumar Congress crisis solver saved Vilasrao Deshmukh
 government in maharashtra
Karnataka Election Result : काँग्रेसच्या दमदार कमबॅकनंतर शरद पवारांसह देशातल्या या ५ चेहऱ्यांची धाकधूक वाढली!

यावेळी कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही आहे. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांची थेट सिद्धरामय्या यांच्याशी लढत आहे. डी.के. शिवकुमार हे राजकारणी असण्यासोबतच एक शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. 2006 मध्ये कर्नाटक स्टेट ओपन युनिव्हर्सिटी म्हैसूर येथून त्यांनी राज्यशास्त्रातील मास्टर ऑफ आर्ट्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

यासोबतच ते काँग्रेस पक्षाचे संकटमोचक आहेत, डी.के शिवकुमार यांनी देशातील अनेक राज्यात काँग्रेसचे सरकार कोसळण्यापासून वाचविले आहेत. त्यामधील एक म्हणजे महाराष्ट्रातील सरकार २००२ मध्ये महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना देखील शिवकुमार याचं रिसॉर्ट राजकारण करावे लागले होते.

D. K. Shivakumar Congress crisis solver saved Vilasrao Deshmukh
 government in maharashtra
Karnataka Election: 'चित्रा ताईचा पायगुण वाईटच...', रूपाली ठोंबरेचा भाजपला खोचक टोला

२००२ मध्ये राजकीय परिस्थितीमुळे अविश्वास ठरावाला सामोरे जाणारे विलासराव देशमुख यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना बँगलोरला आणलं होतं. महाराष्ट्रातील विलासराव देशमुख यांचं सरकार पडण्यापासून वाचवण्यासाठी राज्यातल्या ४० काँग्रेस आमदारांना डीके शिवकुमार यांच्या देखरेखीखाली बेंगलोरच्या ईगलटन रिसॉर्टमध्ये ठेवलं गेलं. त्यामुळे राज्यातील विलासराव देशमुख यांचं सरकार वाचलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com