
निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसकडून प्रशांत किशोर यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
2024 ची निवडणूक प्रशांत किशोर काँग्रेसला जिंकून देणार?
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election) पराभवानंतर काँग्रेस (Congress) पुन्हा एकदा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संपर्कात आहे. पीके यांनी याआधीच पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेतलीय. त्यामुळं गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Himachal Pradesh Assembly Election) काँग्रेसकडून त्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं की, प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना निवडणूक रणनीतीकार म्हणून पक्षासोबत काम करायचं आहे. याआधीही त्यांनी एकदा पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यावेळी काही कारणांमुळं ते येऊ शकलं नाहीत. सूत्रांचं म्हणणं आहे की, प्रशांत यांना पक्षात प्रवेश करून गुजरात (Gujarat Assembly Election) आणि हिमाचल सोबत 2024 च्या निवडणुकीच्या रणनीतीवर काम करायचं आहे.
प्रशांत किशोर यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करून पक्ष निवडणुकीची जबाबदारी सोपवण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, प्रशांत यांना पक्षाचे सरचिटणीस बनविण्याऐवजी त्यांना सल्लागाराच्या भूमिकेतही ठेवावं, असं मत पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलं होतं.
हेही वाचा: पराभवानंतर अखिलेश यादव ॲक्शन मोडमध्ये; चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
या महिन्यात झालेल्या पाचपैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसची भाजपशी थेट लढत होती. उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या तीन राज्यांमध्ये पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात आणि हिमाचल प्रदेशातही या पक्षाची भाजपशी लढत आहे. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसनं आपली कामगिरी सुधारली होती. पण, गेल्या पाच वर्षांत गुजरात काँग्रेस संघटना कमकुवत झालीय. कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खचलंय. अशा स्थितीत पक्षाला निवडणूक रणनीतीकाराची गरज भासू लागलीय.
हेही वाचा: ऑस्कर सोहळ्यातील 'थप्पड' प्रकरणानंतर विल स्मिथच्या पत्नीनं सोडलं मौन
'या' राज्यांत काँग्रेस-भाजपमध्ये थेट लढत
आसाम, चंदीगड, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये दोन्ही पक्षांमध्ये थेट लढत आहे.
प्रशांत किशोर यांनी यांच्यासोबत काम केलंय
2014 - भाजपा (लोकसभा निवडणूक)
2015 - आप (दिल्ली विधानसभा निवडणूक)
2015- महाआघाडी (बिहार विधानसभा निवडणूक)
2019- वाईएसआर काँग्रेस (आंध्र प्रदेश निवडणूक)
2021 -टीएमसी (पश्चिम बंगाल निवडणूक)
2021-डीएमके (तामिळनाडू निवडणूक)
Web Title: Gujarat Himachal Pradesh Election Congress Party Is Likely To Give A Big Responsibility To Prashant Kishor
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..