
Baramati Assembly Election 2024 result Marathi News: देशाचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचा निकाल आज समोर येणार असून अजित पवारांनी पुन्हा एकदा गड राखून आपणच बारामतीचे दादा आहोत हे दाखवून दिले आहे. अजित पवार यांना 99487 मते मिळाली त्यांनी 53502 मतांची आघाडी घेऊन युगेंद्र पवार यांना पराभूत केले. युगेंद्र पवारांना 45985 मते मिळाली आहेत. ही निवडणूक ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय असंतोषाच्या लढाईपेक्षा बारामतीचा नवा वारसदार कोण, हे ठरविणारी होती. पण अजित दादांनी बालेकिल्ला राखला आहे.