Jayashri Jadhav
Jayashri JadhavEsakal

Eknath Shinde Shivsena: सुसाट सुटलेल्या काँग्रेसला कोल्हापूरातून धक्का; आमदाराने केला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

MLA Jayashri Jadhav: कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Published on

लोकसभा निवडणुकीपासून राज्यात काँग्रेस पक्ष दमदार कामगिरी करत आहे. याचबरोबर सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली कोल्हापूरात काँग्रेस सुसाट सुटली आहे. अशात कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी कापल्याने विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी काँग्रेसला आज रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून चंद्रकांत जाधव हे आमदार झाले होते. 2021 मध्ये चंद्रकांत जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर लागलेल्या पोट निवडणुकीमध्ये चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्या निवडून आल्या होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com