Uddhav Thackera_Rajan Teli
Maharashtra Election 2024 Result
Rajan Teli: राजन तेली आमचेच! दिशाभूल झालेले अनेक जण परतणार; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
भाजप खासदार नारायण राणे यांचे विश्वासू समजले जाणारे राजन तेली यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत शुक्रवारी प्रवेश केला.
मुंबई : भाजप खासदार नारायण राणे यांचे विश्वासू समजले जाणारे राजन तेली यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत शुक्रवारी प्रवेश केला. त्यामुळं राणेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडं तेली यांनी पक्षात येण्यामुळं ठाकरेंची कोकणात ताकद वाढणार आहे. यापार्श्वभूमीवर राजन तेली हे आमचेच आहेत मध्यंतरी त्यांची दिशाभूल झाली होती.
पण आता त्यांना कळलंय की ती दिशा योग्य नव्हती. त्यामुळं अनेक दिशाभूल झालेले परत येणार आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केलं आहे.