Latest Marathi Live Updates 29 april 2026 : ‘खरीप हंगामात खतांसोबत इतर उत्पादनांच्या केल्या जाणाऱ्या ‘लिंकिंग’ला आळा घालण्यासाठी ‘उत्तर प्रदेश पॅटर्न’ची कठोर अंमलबजावणी केली जाईल,’ अशी महत्त्वपूर्ण घोषणा कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज केली. या निर्णयामुळे आणि इतर मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा निघाल्याने ‘महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाईड सीड्स डिलर असोसिसिएशन’ने (माफदा) बेमुदत बंद मागे घेतला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...