Prashant Kishor Prediction on Tamil Nadu Elections 2026
esakal
Tamil Nadu Elections 2026: तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सध्याच्या कलांनुसार थलपती विजय यांचा ‘टीव्हीके’ (TVK) पक्ष १०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी ११८ जागांची गरज असते. अशा परिस्थितीत हे कल कायम राहिले, तर विजय यांचा पक्ष सरकार स्थापन करू शकतो. त्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात हा एक ऐतिहासिक निकाल ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.