पुण्याच्या पोटनिवडणुकीत भाजपच श्रीमंत, जाणून घ्या कोणत्या उमेदवाराकडे किती आहे संपत्ती? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune bypoll election

पुण्याच्या पोटनिवडणुकीत भाजपच श्रीमंत, जाणून घ्या कोणत्या उमेदवाराकडे किती आहे संपत्ती?

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकी-तील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अश्विनी जगताप आणि त्यांचे पती दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे एकूण २३ कोटी तीन लाख ६० हजार ८०५ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. तर त्यांच्या

नावावर १२ लाख १० हजार ६८० रुपयांचे कर्ज तर त्यांचे दिवंगत पती आमदार जगताप यांच्या नावावर सहा कोटी ३३ लाख ६५ हजार ३५५ रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी जोडलेल्या शपथपत्रावरून ही माहिती समोर आली आहे.

जगताप यांचा शेती व बांधकाम व्यवसाय आहे. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांच्या पतीची पाच कोटी ४६ लाख ४३ हजार १६ रुपयांची जंगम मालमत्ता असून १२ कोटी

४६ लाख ९६ हजार ८५१ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे २१८ तोळे सोने,

१४२८ तोळे चांदी आहे. त्यांच्या नावे सदनिका नाही. मात्र, औंध (पुणे) येथे वाणिज्य

इमारत व केसे (ता. कराड, जि. सातारा) येथे शेतजमीन आहे. त्यांच्या पतीच्या नावे मरकळ व कोयाळी (ता. खेड) येथे शेती असून, पिंपळे गुरव येथे १९ हजार २५४ चौरस फुटांची बिनशेती जागा आहे. पिंपळे गुरव व कोथरूड येथे वाणिज्य इमारत आहे.

बालेवाडीत निवासी इमारत आहे. त्यांच्या विरुद्ध एकही खटला दाखल नाही. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावावरील जंगम व स्थावर मालमत्ता, गुंतवणूक व कर्जे वारसांच्या नावे करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अश्विनी जगताप यांनी शपथ पत्रात नमूद केले आहे.

अपक्ष उमेदवार राहुल कलाटे ३५ कोटींचे मालक

पिंपरी, ता. ७ ः महाविकास आघाडीतील पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महापालिकेतील माजी गटनेते राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत बंडखोरी करत मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याकडे एकूण ३५ कोटी ६२ लाख ४० हजार ५९४ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या नावावर एक कोटी १० लाख सात हजार २४८ रुपयांचे कर्ज आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना जोडलेल्या शपथपत्रावरून ही माहिती समोर आली आहे.

कलाटे यांचा शेती व व्यापार आहे. बी. कॉम. पर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. तर त्यांच्या नावे रहाटणीत घर व सोळू, नेरे येथे शेतजमीन आहे.

कलाटे यांच्याकडील मालमत्तेची स्थिती

सोने : १५ तोळे

जंगम मालमत्ता : एक कोटी ४० लाख १० हजार ५९३ रुपये

स्थावर मालमत्ता : ३४ कोटी २२ लाख २९ हजार ९९१ रुपये

देणे किंवा कर्ज : एक कोटी १० लाख सात हजार २४८ रुपये

वार्षिक उत्पन्न : ६२ लाख ४० हजार २७० रुपये

राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटेंची मालमत्ता १९ कोटी

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (महाविकास आघाडी) उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे आणि त्यांच्या पत्नी शीतल काटे यांच्याकडे एकूण १९ कोटी ३० लाख १२ हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.

तर त्यांच्या नावावर एक कोटी ९० लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत जोडलेल्या शपथपत्रावरून ही माहिती समोर आली आहे.

काटे यांचा शेती, हॉटेल व बांधकाम व्यवसाय आहे. त्यांचे शिक्षण अकरावीपर्यंत झाले आहे. त्यांची चार कोटी ५२ हजार ६०१ रुपयांची जंगम मालमत्ता असून १५ कोटी २९ लाख ६० हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

त्यांच्याकडे ३५ तोळे सोने आहे. त्यांच्या नावे पिंपळे सौदागर, रहाटणी येथे घर व कान्हूर मेसाई, मुखई, रहाटणी येथे शेतजमीन आहे.

काटे यांच्याकडील मालमत्तेची स्थिती

सोने : ३५ तोळे

जंगम मालमत्ता : चार कोटी ५२ हजार ६०१ रुपये

स्थावर मालमत्ता : १५ कोटी २९ लाख ६० हजार रुपये

देणे किंवा कर्ज : एक कोटी ९० लाख रुपये

वार्षिक उत्पन्न : १४ लाख ९७ हजार ७८० रुपये

कसबा पोटनिवडणुकीती भाजपचे उमेदवार हेमंत  रासने यांच्याकडेल १४ कोटी ७३ लाख ३९ हजार ७२० रुपयांची मालमत्ता 

१० तोळे सोने , किंमत ४ लाख ५२ हजार रुपये

जंगम मालमत्ता, १ कोटी ८२ लाख ८१ हजार ३६२ रुपये

स्थावर मालमत्ता, ७ कोटी ९८ लाख ६0 हजार रुपये

रोख रक्कम, १ लाख ३५ हजार रुपये

काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर आणि दाम्पत्याकडे आठ कोटींची संपत्ती

मालमत्तेची स्थिती

सोने, १० तोळे

जंगम मालमत्ता, ४७ लाख ६ हजार १२८ रुपये

स्थावर मालमत्ता, ४ कोटी ५९ लाख २७ हजार ९१६

वार्षिक उत्पन्न, ३ लाख ३६ हजार रुपये

टॅग्स :pune