फुटीरतावाद्यांचे भाजप प्रेम, मत द्या नाहीतर...

आमच्या विरोधात जो जाईल आणि त्याला पुढच्या परिणामांना सामोर जावं लागेल, अशी स्पष्ट धमकी फुटीरतावादी गटांनी दिली आहे.
BJP
BJPटिम ई सकाळ

सध्या देशात पाच राज्याच्या निवडणुकीचा जोश पाहायला मिळतोय. मणिपूर (Manipur) मध्ये 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. भाजप, काँग्रेस तसेच विविध पक्ष निवडणुकीच्या मैदानात आपला जोर आजमावत आहे. याच पार्श्वभुमीवर मणिपूरमध्ये हिंसाचाराचे पडसाद उमटत असल्याचे चित्र आहे. मणिपूरमध्ये कुकी नॅशनल ऑर्गनायजेशन या १७ फुटीरतावादी गटांच्या संघटनेनं भाजपला पाठिंबा दर्शवलाय. मतदारांनी भाजपलाच मतदान करावे. आमच्या विरोधात जो जाईल आणि त्याला पुढच्या परिणामांना सामोर जावं लागेल, अशी स्पष्ट धमकी फुटीरतावादी गटांनी दिली आहे.

स्वतंत्र राज्याची मागणी करणारी कुकी नॅशनल ऑर्गनायजेशन मागील ३३ वर्षांपासून मणिपूरमध्ये वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करते. . या संघटनेचे मुख्यालय म्यानमारमध्ये आहे. धक्कादायक म्हणजे कुकी नॅशनल ऑर्गनायजेशनने नुकताच दावा केला आहे की मणिपूरमध्ये भाजपचे सरकार आले तर त्यांच्या स्वतंत्र राज्याची मागणीवर विचार करत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारने त्यांना दिले.

BJP
Manipur Assembly Election 2022: मणिपुरमध्ये हिंसाचाराचे पडसाद; राज्यपालांनी केले शांततेचे आवाहन

मणिपूरमध्ये 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर १० मार्चला मतमोजणी होणार आहे. यातच मणिपूरपुरमध्ये हिंसाचाराचे पडसाद उमटत आहे याच पार्श्वभुमीवर शुक्रवारी जारी केलेल्या सुचनेमध्ये मणिपुरचे राज्यपाल यांनी आवाहन केले आहे. “अनुचित प्रकार घडावे नाही तसेच शांततापूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडावी जेणेकरुन या विधानसभा निवडणुकीत लोकांना मुक्तपणे त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येईल.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com