
खासगी क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना १५००० रुपये अनुदान मिळेल.
३.५ कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
योजना १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ या कालावधीत लागू असेल.
PM-VBRY Explainer : भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना तरुणांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली. ‘पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना’ (PM-VBRY) ही तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी योजना आहे. या योजनेंतर्गत खासगी क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून १५००० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. ही योजना देशातील साडेतीन कोटी तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात येत आहे.