Akshaya Tritiya 2023 : आजच्या दिवशी का बनवली जाते कवठाची चटणी?

कवठाचे आरोग्यासाठी अनेक फायदे
Akshaya Tritiya 2023
Akshaya Tritiya 2023esakal

Akshaya Tritiya 2023 : थंडी संपून उन्हाळ्याची चाहुल लागली की बाजारात अनेक फळ उपलब्ध होतात. द्राक्षे, आंबे, सफरचंद, कलिंगड यांची गर्दी असते. त्याच गर्दीत वर्षभर न दिसणारं एक फळ दिसतं. ते म्हणजे कवठ.

कवठ फळ केवळ फेब्रुवारी ते एप्रिल या काळात येतात. त्यामुळे महाशिवरात्री आणि अक्षय तृतीयेला बऱ्याच भागात याचे पदार्थ खाल्ले जातात. शेवटी सगळीच फळं आपले आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. तसेच कवठाचेही आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

Akshaya Tritiya 2023
Panjiri Recipe : रामनवमीच्या प्रसादासाठी कशी बनवायची पंजिरी?

कवठ खाणं इतर फळांएवढं सोपं नाही. बाकीची फळं कापली की लगेच खाता येतात किंवा काही फळांना तर कापण्याचीही गरज नसते. पण कवठ मात्र फोडावं लागतं, त्यात गूळ टाकावा लागतो आणि मग ते खावं लागतं.

कवठाच्या झाडाबद्दल थोडसं

कवठाचे शास्त्रीय नाव फेरोनिया एलेफंटम् व लिमोनीया अॅसीडिस्सीमा असे आहे. हा वृक्ष मूळचा दक्षिण भारतातला आहे. कवठ हा काटेरी व पानझडी प्रकारचे वृक्ष आहे. भारतासहित पाकिस्तान, श्रीलंका, जावा, ब्रह्मदेश, बांगला देश इ. प्रदेशांत कवठाचे वृक्ष आढळतात. या झाडाची उंची ६-९ मी. असते. याची पाने संयुक्त, विषमदली, पिसासारखी एकआड एक, चकचकीत व गुळगुळीत असतात.

कवठ फळ पाडाला आलं की झाडावरून गळून पडतं, ते काढलं जात नाही
कवठ फळ पाडाला आलं की झाडावरून गळून पडतं, ते काढलं जात नाहीesakal
Akshaya Tritiya 2023
उन्हाळ्यात घरच्या घरी झटपट बनवा थंडगार मलाई कुल्फी Ice Cream Recipe

कवठ खाण्याचे फायदे

  • कवठामध्ये बिटा कॅरेटिन चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे केस आणि त्वचा चांगली होते.

  • कवठ हे थंड आणि पाचक फळ म्हणून ओळखलं जातं.

  • ज्या लोकांना भूकच लागत नाही, अशांसाठी कवठ खाणे फायद्याचे ठरते.

  • अपचनासंबंधी अनेक त्रासांवर कवठ गुणकारी आहे.

  • कवठामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कवठ खावे.

  • त्याचबरोबर कवठामध्ये आयर्न, कॅल्शियम, फायबर, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स यांचे उत्तम प्रमाण असते.

  • कवठ फळासोबतच कवठाची पानेही आरोग्यदायी असतात. फायबर आणि व्हिटॅमिन बी कवठाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात असते.

Akshaya Tritiya 2023
Kairi Panha Recipe: उन्हाळ्यात कोल्डड्रिंक ऐवजी प्या कैरीचं पन्हं, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

साहित्य:

दोन मोठे कवठ, अर्धा वाटी ‌गुळ, एक चमच लाल तिखट, मीठ चवीनुसार, अर्धा चमचा जिरे पूड, लसूण पाकळ्या, तेल, हिंग, मोहरी

कृती

सर्वप्रथम दोन मोडे कवठ घेऊन ते फोडून त्याचा मस्त गर काढून घ्यावा. कवठाचा गर काढून त्यात गुळ, लसुण,मिठ घालून हे मिश्रण मस्त मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे.नंतर हे मिश्रण एका वाटीत काढून घ्यावे आणि तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, जिरे पावडर,लाल तिखट  घालावे फोडणी तडतडल्यावर चटणीवर घालून चांगले मिसळून घ्यावे. अशा रितीने आपली कवठाची आंबटगोड चटणी तयार झाली आहे.

Akshaya Tritiya 2023
Meat Less Recipes: बेस्ट Non Vegetarian फुड आहेत या रेसिपीज!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com