Bhakri-Pizza Recipe : भाकरी की पिझ्झा हा वाद सोडा, बनवा हेल्दी 'भाकरी-पिझ्झा'; पाहा रेसिपी

भाकर ही शरीरासाठी पौष्टिक असते. त्यामुळे भाकर पिझ्झासुद्धा हेल्दीच असं म्हणायला हरकत नाही
Bhakri-Pizza Recipe
Bhakri-Pizza Recipe esakal

Bhakri-Pizza Recipe : भाकरी हेल्दी की पिझ्झा? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. मात्र पिझ्झाचा बेसच भाकरीचा असेल तर हा पदार्थ हेल्दी आहे असं म्हणायला हरकत नाही. भाकर ही शरीरासाठी पौष्टिक असते. आज आपण भाकर पिझ्झाची हटके रेसिपी जाणून घेऊयात.

भाकरी पिझ्झा बनवण्यासाठी सगळ्यात आधी पिझ्झा सॉस बनवा. पिझ्झा सॉस बनवण्यासाठी सगळ्यात आधी टोमॅटो अर्धे कापून पाण्यात २-३ मिनिटे उकळा. आता टोमटो पाण्यातून काढून थंड होऊ द्या. आता टोमॅटोच्या आतील बिया काढून घेऊन मोठे काप करा. आता मिक्सरमध्ये टोमॅटोची बारीक पेस्ट करून घ्या. आता पसरट नॉन स्टिक भांड्यात ऑलिव्ह ऑइल गरम करा त्यात लसूण घाला आणि मीडियम फ्लेवर लसूण भाजून घ्या. आता कांदा घ्या आणि मीडियम फ्लेवर १-२ मिनिटे भाजून घ्या.

आता टोमॅटो पेस्ट, ऑरगॅनो, रेड चिली फ्लेक्स, टोमॅटो केचअप, मिर्ची पावडर आणि मीठ घालून चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. आणि मीडियम फ्लेमवर२-३ मिनिटे परतून घ्या. त्यात भाजलेले लसूण आणि कांद्याची पेस्ट करून ती सुद्धा घाला. त्याने सॉसला चव येईल. हा सॉस तुम्ही हवाबंद डब्यात ठेवून कधीही वापरू शकता. (Recipe)

आता भाकर बनवण्यासाठी बाजरीचे पीठ, ज्वारीचे पीठ, तेल आणि मीठ एका बाऊलमध्ये मिक्स करून गरजेप्रमाणे पाणी घालून पीठ मळून घ्या. आता पिठाचे सहा समान भागात तुकडे करून घ्या. आता एक गोळा घेऊन कोयपाटावर ७५ मिमि आकारात गोल लाटून घ्या. (Food)

Bhakri-Pizza Recipe
Bhakri Benefits : इम्यूनिटी वाढवण्यासाठी पोळीपेक्षा भाकरी चांगली

आता एका नॉन स्टिक ताव्यावर लो फ्लेमवर भाकर शिजवा. भाकर दोन्ही बाजूने कुरकुरीत होतपर्यंत तिला दोन्ही बाजूने शेकून घ्या. आता ताव्यावरील भाकरीवर २ टेबल स्पून पिझ्झा सॉस पसरवा. आता त्यावर १ ते दीड टेबल स्पून चीझ समान पसरवा. आता हे स्टफिंगवर झाकण ठेवून स्लो फ्लेमवर ३-५ मिनिटे शिजवून घ्या.

ही भाकरी हलकी थंडी झाल्यावर लगेच सर्व्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com