रोजचा नाश्ता करणं विसरताय? होणारे परिणाम वाचा| Breakfast Skip Problem | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

breakfast
रोजचा नाश्ता करणं विसरताय? होणारे परिणाम वाचा | Breakfast Skip Problem

रोजचा नाश्ता करणं विसरताय? होणारे परिणाम वाचा| Breakfast Skip Problem

कामाच्या धावपळीत रोजचा नाश्ता करणं अनेकांना जमतंच असं नाही. त्यामुळे तुम्हाला अनेक समस्या निर्माण होतात.गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये स्मृतिभ्रंशाबद्दल जागरूकता वाढली आहे, त्यामुळे लोक या आजाराला गांभीर्याने घेऊ लागले आहेत. वयाच्या ६० नंतर स्मृतिभ्रंशाची लक्षणे दिसू लागतात, पण कालांतराने वयाच्या ३० वर्षानंतरही लोक स्मृतिभ्रंशाला बळी पडत आहेत. जीवनशैली आणि कमी शारीरिक हालचालींमुळे त्याचा मेंदूवर सर्वाधिक परिणाम होतो. तसेच नाश्ता न केल्यामुळेही परिणाम होत आहे. यावर अभ्यास करण्यात आला आहे.

हेही वाचा: नाश्ता, जेवणाची योग्य वेळ कोणती? आयुर्वेद काय सांगते जाणून घ्या!

अभ्यास काय सांगतो?- सकाळी पौष्टीक नाश्ता खाल्ल्याने तुमचे डोके एक्टीव्ह राहते तसेच काम करण्यासाठी जास्त एनर्जी मिळते. पण तुम्ही सकाळी नाश्ता केला नाही तर दिवसभर तुम्हाला थकवा जाणवतो. एका अभ्यासानुसार, दिवसातलं पहिलं खाणं सोडल्यास तुम्हाला स्मृतिभ्रंशाचा धोका अधिक आहे. जपानी जर्नल ऑफ ह्युमन सायंसेस ऑफ हेल्थ सोशल सर्व्हिसेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार सकाळचा नाश्ता न केल्यास स्मृतिभ्रंशाचा धोका चार पटीने वाढतो.

हेही वाचा: तुमचा डाएट प्लॅन असा आखा! वजन होईल कमी

अभ्यासातले निष्कर्ष - जपानी जर्नल ऑफ ह्युमन सायंसेस ऑफ हेल्थ सोशल सर्व्हिसेसमध्ये २०११ साली प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार सकाळचा नाश्ता न केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या अभ्यासात जपानमधील एका शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या समुदायावर ६ वर्ष अभ्यास करण्यात आला. यात ६५ वर्षांच्या जवळपास ५२५ लोकांचा सहभाग होता. लिंग आणि वय असूनही ज्या लोकांनी इतके वर्ष नाश्ता केला नव्हता त्या लोकांना स्मृतिभ्रंशाचा धोका चार पटीने जास्त होता, असे आढळले.

हेही वाचा: उन्हाळ्यात Acidity होतेय! हे पाच पदार्थ ठरतील फायद्याचे

Food Craving

Food Craving

स्नॅक्स हा आरोग्यदायी पर्याय नाही- पोटभर अन्न खाण्याऐवजी स्नॅक्स किंवा अनहेल्दी पदार्थ खाण्याची सवय स्मृतिभ्रंशाचा धोका वाढवू शकते, असेही या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. जे लोकं पौष्टीक नाश्ता करत नाहीत त्यांना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता २.७ पट जास्त असते. नाश्त्याच्या सवयींव्यतिरिक्त इतरही अनेक सवयी आहेत ज्यामुळे स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढतो.

हेही वाचा: दुपारच्या जेवणात 'हे' सहा पदार्थ खाताय? असे होतील परिणाम

Web Title: Breakfast Skipping Habit Can Make Health Problem

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top