
उन्हाळ्यात फ्रिजमधले थंड पाणी प्यावे का? किती असावं प्रमाण!
सध्या उष्णतेची लाट सुरू झाली आहे. होळीनंतर तर उकाडा आणखी वाढतो. त्यामुळे लोकं गार पदार्थ खायला सुरूवात करतात. उन्हाळ्यात गार पदार्थ खाल्ल्याने बरे वाटते. पण हे प्रमाण जास्त असले तर त्याचे शरीरावर वाईट परिणाम होतात. कोरोनाच्या भितीमुळे लोकं गार पदार्थ खायला घाबरत आहेत. तरीही आता प्रमाण कमी झाल्यामुळे लोकं थोडी बिनधास्त झाली आहेत. अनेक लोकं फ्रिजमधले गार पाणी पित आहेत. पण, फ्रीजचे थंड पाणी प्यायल्याने कोरोना संसर्ग होऊ शकतो का, असा प्रश्नही लोकांच्या मनात आहे. कोणत्या प्रकारचे पाणी प्यावे आणि फ्रीजमधील थंड पिण्यामुळे काय नुकसान होऊ शकते. ते जाणून घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा: उष्माघातापासून संरक्षण मिळवायचंय! या पाच गोष्टी करा|Heat Wave Care
थंड पाणी प्यायल्याने कोरोना होतो का? - थंड पाणी प्यायल्याने कोरोना होतो का यात काही तथ्य नाही. पण गरम पाणी प्यायल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. गरम पाणी प्यायल्याने गळा आणि नाकाला इंफेक्शन होत नाही. त्यामुळे डॉक्टर कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात.
फ्रिजचे ठंड पाणी प्यायल्यामुळे होते नुकसान- तुम्ही फ्रिजमधले ठंड पाणी पित असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या लोकांना यामुळे त्रास होऊ शकतो. यामुळे घसा खवखवणे, खोकला किंवा इतर संक्रमण होऊ शकते. त्यामुळेच कोरोनाच्या काळात फ्रिजचे पाणी न पिण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
हेही वाचा: Summer Tips: उन्हाळा आलाय, या पाच गोष्टींची काळजी घ्या
उन्हाळ्यात सामान्य तापमानाप्रमाणे पाणी प्या- जर उष्णता खूप जास्त असेल, तर गरम किंवा कोमट पाणी पिण्याऐवजी, आपण खोलीच्या तापमानाप्रमाणे पाणी पिऊ शकता. याने तुमची तहानही भागेल. शिवाय कोणतेही नुकसान होणार नाही. फ्रीजमधले थंड पाणी पिण्याची गरज नाही. थंड पाणी प्यायल्याने तुम्हाला अनेक समस्या येऊ शकतात.
हेही वाचा: उसाचा रस प्या, उन्हाळा सुसह्य करा!

drinking cold water
थंड पाणी पिण्यामुळे येऊ शकतात या समस्या
- घसा दुखणे
- घशाचा संसर्ग
- खोकला-ताप
- डोके दुखणे
- बद्धकोष्ठता
- प्रतिकारशक्ती कमी होणे
- तुम्ही जर भर उन्हातून बाहेरून घरी आलात तर लगेच थंड पाणी पिऊ नका. त्यामुळे तुम्हाला घसा खवखवणे, सर्दी, ताप येऊ शकतो. कोरोनाबाधित रुग्णाने फ्रीजचे थंड पाणी अजिबात पिऊ नये.
हेही वाचा: होळी खेळताना Mobile, Gadgets ची अशी घ्या काळजी!
Web Title: Cold Water Of Fridge In Starting Of Summers Season Cold Water Effect For Health
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..