थंडीत खा मनुके! जाणून घ्या फायदे अनेक

टीम ई-सकाळ
Tuesday, 24 November 2020

मनुके खाल्ल्यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढते. त्यासाठी रात्री मनुके भिजवून सकाळी खावे.

पुणे : हिवाळा सुरु झाला आहे. थंडीच्या दिवसात ड्रायफ्रुट्सला मोठ्या प्रमाणात मागणी मिळते. त्यापैकीचे एक आरोग्यासाठी लाभादायक असे मनुके. मनुके खाल्यामुळे अनेक आजार दूर राहतात आणि आधीपासून जर काही आजार असतील त्यावरही लाभदायी ठरतात. रात्री झोपण्यापूर्वी २-३ मनुके टाकून उकळलेले दूध पिणे फायदेशीर ठरते. सर्दीसारख्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करते. हाडांमधील दुखणे, संधिवात, बद्धकोष्ठतासारखे आजार दूर करते. मनुके हे उष्ण असतात. त्यामुळे थंडीत सेवन करणे लाभदायक ठरते. 

बद्धकोष्ठतेपासून सुटका :
तुम्हाला बध्दकोष्ठता (कॉन्स्टिपेशन)चा त्रास होत असेल तर १० मनुके धूवून एक ग्लास दुधामध्ये उकळून आणि रात्री झोपण्यापूर्वी बीया काढून खाव्या आणि त्यावर दूध प्यावे. नियमित असे सेवन केल्यामुळे तुम्हाला बध्दकोष्ठतेच्या समस्येवर आराम  मिळेल.

हेल्दी रेसिपी : उपवासाचा हेल्दी मेन्यू!​

घशातील त्रासापासून सुटका :
घशात खवखवणे चा त्रास होत असेल तरी रात्री मनुके भिजवून सकाळी उठल्यावर खावे. मनुक्यांमध्ये अॅन्टीबॅक्टोरीअर गुणधर्म असतात. ज्यामुळे घशाला आराम मिळतो. 

लहान मुले राहतात तंदुरुस्त
लहान मुले आजारी पडले की त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. दररोज गरम दुधात ५ ते ६ मनुके त्यांना खायला दिल्यास फायदेशीर ठरते.

अॅनिमियाचा आजार होत नाही
मनुक्यांमध्ये असलेले कॉपर लाल रक्त पेशी निर्माण करण्यास फायेदशीर ठरते. तसेच मनुक्यांमध्ये असलेले आयर्न आणि बी व्हिटॅमिन अॅनिमियावर उपचार करण्यासाठी मदत करतात.

नो युवर डाएट: अंडे का फंडा!
 
डोळ्यांची दृष्टी चांगली राहते :
मनुके खाल्ल्यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढते. त्यासाठी रात्री मनुके भिजवून सकाळी खावे.

हाडांची मजबुती 
मजबूत हाडांसाठी मनुके फार फायदेशीर ठरतात. मनुक्यांमध्ये कॅल्शिमचे प्रमाण जास्त असते. 

रक्त वाढविण्यासाठी फायदेशीर :
मनुके रक्त वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात. रात्री १० मनुके पाण्यामध्ये भिजवा आणि सकाळी दुधामध्ये टाकून उकळून घ्या. थोडे थंड झाल्यावर प्यावे. नियमित सेवन केल्यामुळे शरिरातील रक्त वाढते.
 
ताप कमी करण्यासाठी फायदेशीर :
ताप असल्यास १० मनुके, अंजीरसोबत पहाटे भिजवावे आणि रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये उकळून घ्यावे. तीन दिवस रोज प्यायल्यामुळे ताप कमी होतो.

खजुराचे १० फायदे; सुंदर त्वचा आणि मजबूत हाडे मिळवा; हँगओव्हर उतरवा​

संधीवात आजारावरही फायदेशीर
संधीवाताचा त्रास असेल तर मनुके खाणे फायदेशीर ठरते. त्यामध्ये पॉटेशियम आणि मँग्नेशिअम असते. ज्यामुळे पित्त कमी होते आणि विषारी पदार्थांनो दूर करुन किडनी स्टोन, हदयाचे आजार आणि संधीवात कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. हृदय आजार असतील, तर रोज मनुके खावे. रोज सकाळी मनुके खाल्यामुळे तोंड येत नाही.

- फूड संबंधी इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eating raisins keeps many diseases away