खजुराचे १० फायदे; सुंदर त्वचा आणि मजबूत हाडे मिळवा; हँगओव्हर उतरवा

Dates
Dates

तुम्ही खजूराचे लाडू, खजूराची खीर, खजूर केक, खजूर बर्फी, खजूर रोल हे पदार्थ ऐकले, पाहिले किंवा चाखले असतील. खजूर हे पौष्टीक आहेत हे सर्वांनाच माहित आहे, पण या खजूरांची निर्मिती कशी होते, खजूरांचा मूळ निर्मिती कोठे झाली, त्याचे आणखी काय  फायदे आहेत माहितीये का? चला मग, जाणून घेऊ या टेस्टी आणि हेल्दी खजूरबाबत...

खजूर आणि त्याच्या पौष्टीक तत्वांबाबत मानवाला हजारो वर्षांपासून माहित आहे आणि विज्ञानाने देखील हे सत्य मान्य केले आहे. खजूराची मूळ निर्मिती इराकमध्ये झाली होती असे मानले जाते, पण इटलीच्या लोकांचे म्हणने आहे की, त्याच्या आधीपासून इटलीमध्ये खजूरांपासून वाईन बनवली जाते.

दुसऱ्या देशांसोबत होणाऱ्या व्यापारमार्फत खजूर दक्षिण पश्चिम अशियामधून स्पेन, उत्तर अफ्रिका आणि त्यानंतर मेक्सिको आणि साऊथमध्ये पोहचला. आज मध्य पूर्वभागातील कित्येक पदार्थांमध्ये खजूर हा महत्वपूर्ण पदार्थ आहे. जगभरात ३० प्रकारचे खजूर मिळतात पण शक्यतो त्याचे वर्गीकरण सुकलेले आणि अर्धवट सुकलेले असे केले जाते आणि हा फरक मुख्यत: ग्लूकोज, सुक्रोज आणि फ्रुक्टोज या तीन गोष्टी लक्षात ठेवून केला जातो. यामध्ये  एक उत्तम दर्जाचे खजूर गाझा पट्टीमध्ये आढळते. याशिवाय इजिप्तमध्ये जॅगलोलमध्ये उत्तम प्रतीच्या खजूर मिळतात. आकारने लांब आणि गडद रंगाच्या खजूर खायला एकदम कुरकरीत आणि एकदम गोड असतात. सौदी अरेबियामध्ये मिळणाऱ्या शुक्करे जगातील सर्वात महागड्या खजूर आहेत. या खजूर भुऱ्या रंगाच्या आणि एकमद मऊ असतात. त्यानंतर अरब लोकांना खाद्रावी जोकि प्रिय असलेले अतिशय मऊ आणि गोड खजूर असतात. इराकमध्ये खुजराच्या १०० प्रकार आहे असे म्हटले जातात.

भारतात सुकलेल्या खजूराला खारिक असे म्हटले जाते. भारतात पारंपरिक विधीमध्ये खारिक हे महत्वाचा पदार्थ मानला जातो.  खजूर खायला चविष्ट तर असताताच पण त्याचबरोबर अत्यंत पौष्टीक देखील असतात. खजूरामध्ये वेगवेगळे व्हिटॅमिन्स असतात. तसेच वेगवेगळ्या प्रकाराचे मिनरल्स, शुगर, कॅल्शिअम, आयरन आणि पॉटेशिअमसारखे उपयोगी गुणधर्मही असतात.

जाणून घेऊ खजूरचे १० फायदे :
१. कॉलेस्ट्रॉल कमी करते : 
तुम्हाला माहित आहे का खजूरमध्ये कॉलेस्ट्रॉल आणि साखर(शुगर)चे प्रमाण अतिशय कमी असते. रोजच्या आहारात तुम्ही खजूरचा वापर करुन कॉलेस्टॉलचे प्रमाण देखील कमी ठेवण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला तुमचे वजन कमी करण्यास देखील मदत होईल.

२. प्रोटीन : 
खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. खजूरातील प्रोटीनमुळे तुम्हाला मसल्स मजबूत ठेवायला मदत होते. म्हणून जीम करणाऱ्या लोकांना खुराक म्हणून खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हालाही तुमचे मसल्स मजबूत बनवायचे असतील, तर प्रोटीनयुक्त खजूर नक्की खा.

३. व्हिटॅमिन : 
खजूरमध्ये b1, b2, b3, b5 बरोबरच A आणि C हे व्हिटॅमिन देखील उपलब्ध असतात. तुम्ही जर रोज खजूर खात असाल तर तुम्हाला व्हिटॅमिनसाठी पर्यायी पदार्थ खाण्याची काहीच गरज नाही. तसेच खजूरमध्ये ग्लुकोज, सुक्रोज और फ्रुक्टोज असतात, जे दिवसभर तुमच्या शरीरात ऊर्जा टिकून ठेवण्यास फायदेशीर ठरते.

४. हाडांची मजबूती :
खजूरमध्ये असलेले मॅंगनीज, कॉपर, आणि मॅग्नेशियमसारखे तत्व तुम्हाला हाडांना तंदुरुस्तीसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. तसेच तुम्हाला ऑस्टियोपोरोसिससारख्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी देखील मदत करतात.

५. नर्वस सिस्टीमला संतुलित राखते :
खजूरचे सेवन केल्यामुळे शरीरातील सोडीयमचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे तुमचे नर्वस सिसिस्टीम संतुलित राखण्यासाठी अत्यंत महत्त्वपुर्ण भूमिका बजावते.
 
६. आयर्न : 
खजूरमध्ये तुमच्या दाताला मजबूत ठेवणाऱ्या फ्लोरीनशिवाय आर्यनचा देखील समावेश  असतो. आयर्नच्या कमीमुळे शरीरात काही समस्या निर्माण होतात. जसे श्वास घेण्यास त्रास होणे, अॅनीमिया, थकवा इ. तसेच, तुमचे रक्त शुध्द करण्यासाठी देखील ते आर्यन फायदेशीर ठरते.

७. पचनसंस्था संतुलित राहते :
तुम्ही सकाळी उठल्यावर भिजवलेले खजूर खाल्ले, तर त्यातील फायबरमुळे तुमची पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते. तसेच कॉन्सिटपेशनच्या पेशंटला देखील असे खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो.

८. त्वचेवर तेज निर्माण करते :
खजूरमध्ये असलेले व्हिटॅमिन c आणि d तुमची स्किनला ढिल्ली पडू नये , सुरकुत्या पडू नये यासाठी फायदेशीर ठरते. तसेच त्वचा कोमल बनविण्यासाठी देखील हे फायदेशीर ठरते. खजूरमध्ये उपलब्ध अॅन्टी एजिंग गुण तुमच्या शरीरात मेलॅनिन साठू नये यासाठी फायदेशीर ठरते.

९. वजन वाढविण्यासाठी फायदेशीर :
साखर, प्रोटीन आणि इतर व्हिटॅमिनचा खजूरमध्ये समावेश असल्यामुळे वजन वाढविण्यास फायदेशीर ठरते, असं म्हणतात की, खजूरची खीर खाल्यामुळे वजन एका संतुलित प्रमाणात वाढते.

१०. हँगओव्हर उतरविण्यासाठी फायदेशीर :
रात्रभर भिजवलेले खजूर खाल्यास हँगओव्हर उतरविण्यास फायदेशीर ठरते असे म्हटले जाते. त्यामुळे रात्री हँगओव्हर चढण्याआधीच खजूर पाण्यात भिजवायला विसरु नका.

- फूड संबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com