Kathiawadi Kachori : चवदार, चटकदार काठियावडी कचोरी घरीच बनवा, रेसिपी एकदम सोप्पीय

या चटपटीत कचोरीसोबत गरमागरम चहाचा आस्वाद घेतला जातो
Kathiawadi Kachori
Kathiawadi Kachoriesakal

Kathiawadi Kachori : भारतीय स्ट्रीट फूडचा विचार केला तर तुम्ही कचोरीला वगळू शकत नाही. कणके गोळ्याच्या आत मसाल्यांनी भरलेल्या आणि तेलात तळलेल्या कचोऱ्यांची चव काही वेगळीच आहे. भारतातल्या अनेक कोपऱ्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या कचोरी मिळतात. त्या प्रत्येकाची वेगळी अशी खासियत आहे.

कचोरी वरून जरी सारखी दिसत असली तरी तिची चव गोड, तिखट अन् चटपटीत असते. तुम्हीही कचोरी लव्हर असाल तर आज आपण सगळ्यात भारी अशी काठियावाडी कचोरी कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही गुजरातची प्रसिद्ध डिश आहे.

या चटपटीत कचोरीसोबत गरमागरम चहाचा आस्वाद घेतला जातो. गुजराती लोक कधीही कचोरी खाऊ शकतात. याची प्रचिती तुम्हाला गुजराती घरात गेल्यावर येईलच. कारण, त्या घरात सकाळ संध्याकाळच्या नाश्त्याबरोबर लग्नाच्या मेन्यूतही कचोरी असतेच.

Kathiawadi Kachori
Corn Rava Balls Recipe: नाश्त्यासाठी बनवा मसालेदार कॉर्न रवा बॉल्स, ही आहे सोपी रेसिपी

होय, गुजराती लग्नातही कचोरी हखास असतेच. गुजराती खाद्यपदार्थ म्हणजे ढोकळा, खाखरा आणि फाफडा असे ज्यांना वाटत होते, त्यांना हे वाचून जरा वेगळं वाटेल. पण हे सत्य आहे.

गुजरातमधील काठियावाडमध्ये राजकोट, जामनगर, जुनागढ, भावनगर, सुरेंद्रनगर आणि पोरबंदर यांचा समावेश आहे. या प्रदेशातील  खाद्यपदार्थांमध्ये प्रामुख्याने डाळी, धान्य आणि जिरे, मिरची आणि हळद यांसारख्या अनेक मसाल्यांचा समावेश होतो.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुजराती खाद्यपदार्थांप्रमाणेच, काठियावाडी पदार्था हे तितकेच चविष्ट आणि मसालेदार आहेत. कचोरीबद्दल इतकं ऐकून तुम्हाला वाटेल की ही बणवायला अवघड असेल. पण, तसं नाही फार कमी वेळात ही कचोरी तयार होते.  

Kathiawadi Kachori
Breakfast Recipe : शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी पराठा, नक्की ट्राय करा ही रेसिपी

कचोरी बनवण्यासाठी प्रथम मैदा घ्या आणि त्यात मीठ, तेल आणि पाणी घालून पीठ मळून घ्या. आता आपण उकडलेले आणि मॅश केलेले हिरवे वाटाणे जिरे, आले, हळद आणि इतर काही मसाले मिसळून सारण तयार करून घेऊ. आणखी चवदार बनवण्यासाठी त्यात भाजलेल्या शेंगदाण्याच्या कूट घालावा.

आता पिठाचे गोळे बनवून त्यात सारण भरा, आणि थोडे पातळ होईपर्यंत लाटून घ्या. सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तुमची स्वादिष्ट काठियावाडी कचोरी तयार आहे.

Kathiawadi Kachori
Bhakri-Pizza Recipe : भाकरी की पिझ्झा हा वाद सोडा, बनवा हेल्दी 'भाकरी-पिझ्झा'; पाहा रेसिपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com