esakal | लॉकडाऊनमध्ये जेवण बनवायला शिकली अन् 58 मिनिंटात 46 डिशेस बनवत केलं वर्ल्ड रेकॉर्ड!
sakal

बोलून बातमी शोधा

Laxmi Sai Set World Record after Making 46 dishes in 58 minutes

लॉकडाऊनमध्ये जेवण बनवायला शिकली अन् 58 मिनिंटात 46 डिशेस बनवत केलं वर्ल्ड रेकॉर्ड!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तमिळनाडु : स्वंयपाक बनविणे ही एक कला आहे आणि अत्यंत अवघड अशी ही कला आहे. साधं रोजचे घरातील जेवण बनवयाचे असले तरी दीड-दोन तास जातात. त्यात त्याची तयारी करण्यासाठी देखील खूप वेळ लागतो. पण, तुम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल की, लक्ष्मी साई नावाच्या लहान मुलीने फक्त 58 मिनिंटात तब्बल 46 डिशेस बनविल्या आहेत.

विश्वास बसत नाही ना! पण ही कमाल लक्ष्मीने करुन दाखवली आहे. तामिळनाडुची राजधानी  चेन्नईमध्ये राहणाऱ्या एका लहान मुलीने आपल्या पाक कलेची कमाल दाखवून 'युनिको बुक ऑफ वल्ड रेकार्ड'मध्ये नाव नोंदवले आहे. 

सराफी व्यावसायिकाचा पिस्तुलातुन गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

याबाबत एस एन लक्ष्मी साई म्हणते, याचे श्रेय मी माझ्या आईलाचे देत आहे कारण तिनेच मला जेवण बनवायला शिकवले आहे. आज मी खूप खूष आहे आणि मला स्वतःचा अभिमान वाटत आहे. 

लक्ष्मीची आई एन. कलीमगल म्हणातात, की, लक्ष्मीने लॉकडाऊनमध्ये जेवण बनविणे शिकली आहे आणि ती खरचं खूप चांगले काम केले आहे. लक्ष्मीच्या वडिलांनीच वर्ल्ड रेकॉर्ड बनविण्याची कल्पना सुचविली होती.

हे ही वाचा : पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 ''मला तामिळनाडुमधील विविध पारंपारिक पाककृती बनविता येतात. लॉकडाऊनमध्ये माझी मुलगी माझ्यासोबत किचनमध्ये काम करायची. लक्ष्मीला पाककलेची आवड आहे हे जेव्हा मी लक्ष्मीच्या वडिलांना सांगितले तेव्हा त्यांनी सुचविले होते की, पाककलेतच वर्ल्ड रेकॉर्ड सेट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा आम्हाला ही कल्पना सुचली.''

त्यानंतर लक्ष्मीच्या वडीलांनी याबाबत रिसर्च करुन माहिती काढली तेव्हा त्यांना समजले की केरळामधील10 वर्षाच्या सानवीने 10 मिनिंटाक 30 डिशेश बनविण्याचे रेकॉर्ड सेट केले आहे. आपल्या मुलीने सानवीने रेकॉर्ड सेट केले रेकॉर्ड मोडावे असे त्यांना तेव्हा वाटले. 

हेही वाचा- Gold Price - सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं; चांदीच्या दरातही वाढ

लक्ष्मीच्या या कौशल्याची सोशल मिडियावर खूप कौतुक होत आहे. आम्हाला डाळ भात बनवाया देखील 2 तास लागातात अशा कॉमेंट करत लक्ष्मीच्या कौशल्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
 

महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

loading image