Shravan 2022: वजन कमी करणारे मेथीचे लाडू कसे तयार करायचे?

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकजण पोट भरण्यासाठी बाहेरचं अन्न पदार्थ खातात.
Methi Laddu Recipe
Methi Laddu Recipe Esakal

Methi Laddu Recipe: सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकजण पोट भरण्यासाठी बाहेरचं अन्न पदार्थ खातात.

बहुतेकदा तर वेळ नसल्याने बाहेरून जेवण ऑर्डर केले जाते. तर काही लोक कामाच्या गडबडीत जेवणाऐवजी फास्ट फूडवर आपली भूक भागवतात. परंतु तुमच्या या सवयी आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतात. तुमच्या या अशा सवयीमुळे तुमचे वजन झपाट्याने वाढू लागते आणि शरीराचा शेफ बिघडू लागतो. अशा परिस्थितीत वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे फार कठीण होते.

परंतु तुम्ही जर का लाडूचे शौकीन असाल तर तुम्ही तुमचे वजन अगदी सोप्या पद्धतीने कमी करू शकतात.

श्रावणात हे लाडू खाणे पौष्टिक असते. वजन नियंत्रित करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला मेथीच्या लाडूचे फायदे सांगणार आहोत.

तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर मेथीचे लाडू तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. मेथीची चव कडू असते परंतु आज आम्ही तुम्हाला जी रेसिपी सांगणार आहोत त्यामुळे तुम्हाला हे कडू लागणार नाहीत आणि तुम्ही हे लाडू आवडीने खाऊ शकाल. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक रात्री मेथी भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खातात. परंतु मेथीच्या कडवट चवीमुळे सर्वांना असे करणे शक्य होत नाही. परंतु आता तुम्ही मेथीचे लाडू खाऊन वजन कमी करू शकता. चला तर मग बघू या वजन कमी करणारे मेथीचे लाडू कसे तयार करायचे याची रेसिपी..

Methi Laddu Recipe
Health: उत्तम आरोग्य आणि उत्तम चव देणारे नाचणीचे लाडू कसे तयार करायचे?

साहित्य:

1) एक वाटी मेथी

2) दिड वाटी गूळ

3) दोन वाटी गव्हाचे पीठ

4) दूध

5) ड्रायफ्रुट्स (काजु,बदाम, पिस्ता)

6) सुंठ

7) वेलची

8) तूप

कृती:

हे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम मेथ्या पाण्यात भिजवून वाळू घालाव्या. नंतर त्या मिक्सर मधून बारीक वाटून घ्याव्या. नंतर त्यात आपल्या आवडीनूसार बारीक केलेले ड्रायफ्रुट्स, सुंठ, वेलची घालावी.

दुसरीकडे एका कढईत तूप गरम करून त्यात गव्हाचे पिठ आणि मेथीचे मिश्रण चांगले भाजून घ्यावे.

हू मिश्रण चांगले भाजले की तुम्ही त्यात बारीक केलाला गूळ तसेच थोडेसे कोमट दूध घालावे.

नंतर हे मिश्रण चांगले एकजीव करुन या मिश्रणाचे लाडू तयार करावे.

तयार केलेल्या लाडूपैकी रोज सकाळी रिकाम्या पोटी हा एक लाडू खावा. यामुळे तुमचे वजन वेगाने कमी होण्यास मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com