Recipe : पान आइस्क्रीम कसे तयार करावे?, पहा हेल्दी आणि सोपी रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

recipe of pan ice cream

आइस्क्रीम केवळ चवीलाच स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते.

Recipe : पान आइस्क्रीम कसे तयार करावे?, पहा हेल्दी आणि सोपी रेसिपी

तुम्हाला रात्रीच्या जेवणानंतर काही गोड खायला आवडत असेल तर ही खास रेसिपी तुमच्यासाठी आहे. आइस्क्रीम हे जवळपास सर्वांना आवडणार एक खास पदार्थ आहे. यामध्ये अनेक फ्लेवर तुम्ही ट्राय केले असतली मात्र यातील एक वेगळा आणि खास फ्लेवरचा आईस्क्रीम सध्या मार्केटला उपलब्ध झाला आहे. आम्ही बोलतोय ते पान आइस्क्रीम या डिशसंदर्भात. हे आइस्क्रीम केवळ चवीलाच स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. या आइस्क्रीममध्ये जोडलेली सुपारीची पाने पचन सुधारण्यासाठी आणि शरीरातील काही सूज दूर करण्यासाठी प्रभावी मानली जातात. चला तर मग जाणून घेऊया चविष्ट पान आईस्क्रीम कसे बनवावे? (recipe of pan ice cream)

कृती

  • पान आईस्क्रीम बनवण्यासाठी साहित्य

  • फुल क्रीम दूध दीड लिटर

  • गुलकंद कप

  • हिरवी वेलची पावडर

  • सुपारीची पाने ४

  • दूध कप

कृती -

पान आइस्क्रीम बनवण्यासाठी प्रथम सुपारीची पाने घेवून ती नीट धुवून घ्या. ही पाने साफ केल्यानंतर पुन्हा पाण्यात भिजवा आणि काही वेळ तसेच राहू द्या. यानंतर सुपारी पाण्यातून पुसून बाजूला काढून ठेवा. आता ब्लेंडर घ्या, त्यात सुपारीची पाने, गुलकंद आणि कंडेन्स्ड मिल्क टाका आणि गुळगुळीत पेस्ट होईपर्यंत चांगले बारीक करा. आता ही पेस्ट एका भांड्यात काढून बाजूला ठेवा. आता एक वेगळे भांडे घ्या आणि त्यात फुल क्रीम दूध उकळा.

दूध अर्धे होईपर्यंत उकळत रहा. हे करत असताना दूध अधून मधून ढवळत राहा. आता त्यात चिमूटभर वेलची पूड टाका आणि दूध घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. आता त्यात तयार केलेली सुपारीची पेस्ट टाका आणि ग्रॅंडरच्या मदतीने चांगले फेटून घ्या. आता ही आईस्क्रीम पेस्ट आईस्क्रीम मोल्ड किंवा ट्रेमध्ये काढून घ्या. रात्रभर सेट करण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. दुसर्‍या दिवशी डिमॉल्ड करा आणि सर्वांना सर्व्ह करा आणि घरी तयार केलेल्या पानआईस्क्रीचा आनंद घ्या.