Special Gavran Chicken: जीभेवर चव रेंगाळत राहणार, ट्राय करा 'ही' रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Special Gavran Chicken recipe

Special Gavran Chicken: जीभेवर चव रेंगाळत राहणार, ट्राय करा 'ही' रेसिपी

आज रविवार आहे. मग त्यामुळे काहीतरी खास बेत झालाच पाहिजे म्हणून रविवार स्पेशल गावरान कोंबडीचे चिकन कसे तयार करायचे याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत.

साहित्य:

1) एक किलो कोंबडीचे चिकन

2) दोन मोठे कांदे बारीक चिरून

3) दोन चमचे हळद

4)तिन चमचे लाल तिखट ( काश्मिरी मिरची तिखट एक चमचा)

5) आवडीनुसार मीठ

6) फोडणी साठी तेल

हेही वाचा: मटण खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळा; अन्यथा या परिणामांना तयार राहा

मसाला तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :

1) दोन मोठे कांदे

2) कोथिंबीर

3) दोन चमचे पांढरे तीळ

4) एक चमचा जिरे

5) एक गाठा लसूण पाकळ्या

6) आल्याचा तुकडा

7) दीड वाटी किसलेले खोबरे

8) चार ते पाच लवंग

9) एक तमालपत्र

10) अर्धा चमचा शाही जिरे

11) एक चमचा धणे पावडर

12) एक जावित्रीची पाकळी

13) दोन हिरव्या वेलायची

14) चार पाच काळी मिरे

कृती:

  • चिकन आणल्यानंतर त्यावर मीठ टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. नंतर चिकनच्या तुकड्यांना हळद आणि मीठ चोळून अर्धा तास बाजूला ठेवावे. नंतर मग गरम

    मसाल्यासाठी लागणारे सगळे साहित्य तव्यात हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यावेत.

  • त्यानंतर दोन मोठे कांदे डायरेक्ट गॅसच्या जाळावर भाजून घ्यावे. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले खोबरे, तीळ, जिरे,आले लसूण, कोथिंबीर व थोडं तेल घालून मसाला वाटून घ्यावा .

  • एका कढईत थोडसं तेल टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा. कांदा चांगला करडा होईपर्यंत परतून घ्यावा. नंतर त्यात चिकनचे तुकडे घालून 2-3 मिनिटे मोठ्या आचेवर परतून घ्यावेत. नंतर 5 वाटी गरम पाणी घालून आच मंद करून झाकण घालून शिजू द्यावे.

हेही वाचा: घरीच बनवा 'चंपारण मटन करी', जाणून घ्या रेसिपी

  • साधारण 30 ते 35 मिनिटे चिकन शिजवल्यावर, चिकनचे अधिक मास असलेले तुकडे सुक्यासाठी वेगळे काढून घ्यावेत आणि काही तुकडे. ते रश्श्यातच राहू द्यावे. त्यात दीड चमचा लाल मिरची पूड, दोन चमचे गरम मसाला आणि मसाल्याचा एक तृतीयांश भाग वाटण रश्श्यात घालावे . मीठ चवीप्रमाणे घालावे. मंद आचेवर 7 ते 8 मिनिटे शिजू द्यावे. चिकन रस्सा तयार आहे, गॅस बंद करून झाकून ठेवावे.

  • चिकन सुक्क बनवण्यासाठी एका कढईत तिन चमचे तेल गरम करावे. त्यात लांब चिरलेला कांदा घालून साधारण गुलाबी होईपर्यंत परतावा. त्यात उरलेली लाल मिरची पूड, उरलेला गरम मसाला पावडर, उरलेले वाटण आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करून घ्यावी. मसाला नीट मंद आचेवर शिजवून घ्यावा.

  • मसाला शिजला की त्यात चिकनचे तुकडे घालून एकत्र करावेत. त्यात दीड कप गरम पाणी घालावे. मंद आचेवर शिजू द्यावे.

  • 7 ते 8 मिनिटे शिजवल्यावर चवीप्रमाणे मीठ घालावे. गॅस बंद करावा आणि आता तुमचं चिकन सुकं तयार आहे .

  • तुम्ही गावरान कोंबडी चिकन आणि भाकरी,पोळी, भातासोबत खाऊ शकता.

Web Title: Special Gavran Chicken Recipe Check Here Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top