Pineapple Halwa Recipe : अननसाचा हलवा खा अन् बोन्स स्ट्रॉंग ठेवा

अननसाचा शीरा किंवा हलवा कसा करायचा? जाणून घ्या
Pineapple Halwa Recipe
Pineapple Halwa Recipesakal

अनेकांना गोड खाण्याची सवय असते. जेवणासोबत तर गोड काहीतरी हवंच असतं. पण त्यातही अनेकजण वजन वाढण्याच्या भीतीने गोड खाण्यास टाळतात. पण तुम्हाला माहीती आहे का असा गोड पदार्थ ज्यामुळे तुमचं वजन अजिबात वाढणार नाही ते म्हणजे अननसाचा शीरा. आज आपण अननसाचा शीरा किंवा हलवा कसा करायचा? जाणून घेणार आहोत.

साहित्य :

२ वाट्या अननस तुकडे बारीक चिरून

१ वाटी खवा

१ वाटी साखर

४-५ चेरी चिरून

२ चमचे तूप.

Pineapple Halwa Recipe
Gajar Ka Halwa: हिवाळ्यात गाजरचा हलवा खा अन् कोलेस्ट्रॉल कमी करा

कृती :

  • अननस चिरून हलक्या हाताने पिळून घ्यावा.

  • नंतर त्यात साखर मिसळावी आणि कढईत तूप टाकून त्यावर ते मिश्रण परतावे.

  • १० ते १२ मिनिटे परतावे. मंद आचेवर शिऱ्याइतपत कोरडेसर होऊ द्यावे.

  • मग त्यात खवा हाताने मोडून घालावा. पुन्हा ४-५ मिनिटे परतावे.

Pineapple Halwa Recipe
Banana chips Recipe : कच्चा केळीचे पौष्टिक चिप्स घरच्या घरी कसे तयार करायचे?
  • गाजर हलव्याप्रमाणे मोकळे होऊ द्यावे, मग उतरवावे.

  • वरून चिरलेल्या चेरीज टाकाव्यात.

  • उपासासाठी एक वेगळी स्विट डिश म्हणून करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com