Cooking Tips : भजी क्रिस्पी करण्यासाठी वापरा या ५ टिप्स

बऱ्याचदा भजी बनवल्यानंतर ५-१० मिनीटात सॉफ्ट होतात. आम्ही तुम्हाला असे काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे क्रिस्पी भजी बनतील.
Cooking Tips
Cooking Tipsesakal

तसे तर भजी बनवणे फार सोपे आहे पण नीट बनले नाही तर मजा येत नाही. म्हणूनच आम्ही अशा काही टिप्स घेऊन आलो आहोत ज्यामुळे भजी कुरकुरीत आणि चविष्ट बनतील.

Cooking Tips
Cooking Tips : सिलेंडरमध्ये गॅस कमी आहे? हे उपाय करा

तर जाणून घेऊया टिप्स

१) टपरीवाल्यासारखे कुरकुरीत भजी हवी असतील तर भज्याच्या बॅटरमध्ये थोडेसे तांदळाचे पीठ कालवा. जर ४ कप बेसन पीठ घेतले तर १ कप तांदळाचे पीठ घ्या.

२) जर तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही. बॅटरमध्ये २ चमचे अरारुट पावडर मिक्स करा म्हणजे भजी कुरकुरीत होतील.

३) भजी क्रिस्पी बनवण्यासाठी त्यांना योग्य पध्दतीने बनवणे आवश्यक असते. त्यामुळे जर भज्यांमध्ये भाज्या घलणार असाल तर त्या एकदम बारीक चिराव्या.

Cooking Tips
Food Tips : या गोष्टी दह्यासोबत खाल्यास आरोग्यास धोका

४) भजी क्रिस्पी होण्यासाठी तेल योग्यप्रमाणात तापलेले असणे आवश्यक आहे. कढईत तेल घेतल्यावर ते चांगले तापू द्यावे. जर खूप जास्त तापले तर भजी वरून जळतात आणि आतून कच्चे राहतात. भजी तळण्यासाठी गॅस मीडियम आचेवर ठेवावा.

५) जर तुम्हाला वाटत असेल की, भज्यांमध्ये तेल कमी ॲब्जॉर्ब व्हावे, तर तेलात अर्धा चमचा मीठ घाला. यामुळे तेल कमी ॲब्जॉर्ब होईल आणि भजी क्रिस्पी होतील.

Cooking Tips
Cooking Hacks: कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com