Raw Mango - Tomato Chutney: आंबटगोड चटणीने जेवण करा खास; अशी तयार करा कैरी-टोमॅटो चटणी

Tomato-Raw Mango Chutney Recipe : टोमॅटो आणि कच्च्या कैरीची चटणी तयार करा आणि तुमच्या जेवणात आंबटगोड चवचा ट्विस्ट आणा!
Tomatoes and Raw Mango Chutney
Tomatoes and Raw Mango Chutneysakal
Updated on

Tomato-Raw Mango Chutney Recipe: उन्हाळ्यात काहीतरी चविष्ट, झणझणीत आणि थोडं टॅंगी खायची इच्छा होते ना? मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे! टोमॅटो आणि कैरी या दोन आंबटगोड घटकांनी तयार झालेली ही खास चटणी तुमच्या रोजच्या जेवणात एक भन्नाट चव आणते. गरम भाकरीसोबत, वरण-भातासोबत किंवा अगदी पराठ्यासोबतही ही चटणी चवदार लागते. चला तर मग, आजच बनवा ही उन्हाळी स्पेशल टोमॅटो-कैरीची चवदार चटणी.

Tomatoes and Raw Mango Chutney
Healthy Kulfi Bites Recipe: उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी बनवा 'हेल्दी कुल्फी बाइट्स', लगेच नोट करा रेसिपी

साहित्य

  • २ टेबलस्पून तेल

  • २ टोमॅटो

  • अर्धी कच्ची कैरी

  • ८-१० लसूण पाकळ्या

  • ३ हिरव्या मिरच्या

  • १ टीस्पून साखर

  • चवीनुसार मीठ

  • १ टीस्पून काश्मिरी लाल तिखट

  • बारीक चिरलेला अर्धा कांदा

  • कोथिंबीर

  • अर्धा लिंबाचा रस (ऐच्छिक)

कृती

  • २ टोमॅटो अर्धे कापून घ्या.

  • कढईमध्ये कच्ची कैरी, लसूण आणि हिरव्या मिरच्यांसोबत टोमॅटो भाजून घ्या.

  • टोमॅटो थोडे थंड झाल्यावर त्याची सालं काढा.

  • सर्व भाजलेले घटक साखर आणि मीठ घालून पाटा वरवंट्यावर चांगलं वाटून घ्या. पाटा वरवंटा नसेल तर मिक्सरमध्ये तुम्ही हे बारीक करू शकता.

  • वाटलेल्या मिश्रणात काश्मिरी तिखट, चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून नीट मिक्स करा.

  • तुमची खास टोमॅटो-कैरी चटणी आता तयार आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com