
Breakfast Recipe : अहो रव्याचा उपमा विसराल इतका टेस्टी लागतो हा उपमा...
Poha Upama Recipe : नाश्ता म्हटलं की, पोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा, उत्तपा, मेदू वडा हे पदार्थ डोक्यात येतात. आपल्याकडे जास्तीतजास्त पोहे केले जातात. मुळात बनवायला खूप सोपा आणि कमी वेळ खर्चीक असल्याने प्रत्येक घरात यांना विशेष पसंती आहे. पोह्यांपासून अनेक पदार्थ बनवले जातात, कांदे पोहे, तर्री पोहे, पोहे कटलेट पण कधी पोह्यांचा उपमा खाल्ला आहे का?
साहित्य :
- पोहे
- तेल किंवा तूप
- मोहरी
- चना डाळ
- उडीद डाळ
- आलं
- हिरवी मिरची
- कडीपत्ता
- बारीक चिरलेला कांदा
- मटार
- बारीक चिरलेला गाजर
- बारीक चिरलेली सिमला मिरची
- बारीक चिरलेला टॉमेटो
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- मीठ
- पाणी
कृती :
- एका मिक्सरच्या भांड्यात पोहे घ्या. त्याची बारीक पावडर करून घ्या. आता एका कढईत तेल अथवा तूप गरम करत ठेवा. त्यात पोह्यांपासून तयार केलेला रवा भाजून घ्या. सोनेरी रंग येईपर्यंत खमंग भाजून घ्या. आता हा रवा प्लेटमध्ये काढून घ्या.
- दुसरीकडे एक कढई गरम करत ठेवा. त्यात तेल टाका, तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, चना डाळ, उडीद डाळ, बारीक चिरलेलं आलं, हिरवी मिरची, कडीपत्ता टाकून मिश्रण मिक्स करा.
- आता त्यात बारीक चिरलेला कांदा, मटार, गाजर, सिमला मिरची घालून तेलामध्ये भाजून घ्या. आता बारीक चिरलेला टॉमेटो आणि मीठ घालून मिश्रण मिक्स करा. भाज्या तेलात भाजून झाल्यानंतर त्यात पाणी घाला.
- मिश्रणाला ५ मिनिटे तसेच ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात पोह्यांचा रवा घालून मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर शेवटी कोथिंबीर उपमावर पसरवा. अशा प्रकारे हटके पोह्यांचा खमंग उपमा तयार आहे.