esakal | गौरीच्या हारांची जोडी ३५०० पर्यंत
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada

गणेशोत्सवापाठोपाठ आता जेष्ठगौरींचे आगमन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गणेशोत्सवापाठोपाठ आता उद्या रविवारी (Sunday) जेष्ठगौरींचे (महालक्ष्मी) आगमन होत आहे. त्यामुळे फुलांची मागणी वाढली असून आवक कमी असल्याने भाव किंचित वाढले आहेत. परिणामी, गौरीच्या (Gauri) फुलांच्या (Flower) हारांचे दरही वधारले असून १२०० ते साडे तीन हजार रुपयापर्यंत गेले आहे. गेल्या चार ते पाच दिवसापासून हारांची बुकिंग जोमाने होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

गणेशोत्सव काळातच महालक्ष्मीचे आगमन होते. मात्र, सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे सावट असल्याने मंडळांकडून हवी तशी हारांना मागणी नाही. मात्र, महालक्ष्मीसाठी हार, वेणी, गजरा, पूजेसाठी फुलांची खरेदी करण्यावर भर आहे. त्यामुळे बाजारांमध्ये फुलांची मागणी वाढली आहे. गेल्या आठवड्यात ६० ते ७० रुपये किलोप्रमाणे मिळणाऱ्या निशिगंधासाठी आता ३५० ते ४०० रुपये मोजावे लागत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये प्रती किलो २० रुपयांपेक्षा कमी दराने उपलब्ध होणारी झेंडूची फुलांना देखील ६० ते ७० रुपये भाव मिळत आहे. याशिवाय देशी गुलाब २०० ते २५० रुपये किलो, शिर्डी गुलाब ३५० ते ४०० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. तसेच महालक्ष्मीसाठी लहान हारांची जोडी १२०० रुपयांना, मोठ्या हारांची जोडी ३००० ते ३५०० रुपयांना उपलब्ध आहे.

हेही वाचा: मंडई : फळभाज्यांच्या भावात वाढ

रविवारी घरोघरी गौरींचे (महालक्ष्मी) आगमन होणार असल्याने तीन दिवसापासूनच महिलावर्गाकडून गौरींच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होती. गौरींसमोरील सजावट साहित्य, फुलांचे हार, पूजा साहित्य, फळे, नैवेद्यासाठीच्या भाजी असे विविध साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. यंदा पावस सतत येत असल्याने फुले ओली झाली आहे. त्यामुळे फुलांचा तोडा वाढलेला असल्याने भावात हवी तशी वाढ झालेली नाही, असे ॲरोमा फ्लॉवर्सचे संचालक जयंत रणनवरे यांनी सांगितले.

हेही वाचा: शेंगदाण्याच्या भावात वाढ

खरेदीसाठी महिलांची लगबग

गौरीच्या रूपाने सासुरवाशिणी लेकी माहेरी येतात अशी धारणा आहे. या निमित्ताने खापराचे-पितळाचे मुखवटे तर काहींकडे धातूंचे, तसेच मातीच्या उभ्या अथवा पाटावर मांडलेल्या गौरी असतात. गौराईची तीन दिवस पूजा करून पंचपक्वान्नांचा नैवेद्य अर्पण केला जातो. उद्या रविवारी हा उत्सव सुरु होणार असल्यामुळे गौरीचे मुखवटे, सजावटीसाठी लागणारे दागिने, साडी-चोळी, साजश्रृंगाराचे साहित्य, फुले, ओटीचे साहित्य, फळे व भाज्या खरेदीसाठी महिलांची लगबग सुरु होती.

loading image
go to top