Ganeshotsav 2022 : घरीच बनवा इको फ्रेंडली गणेश मूर्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022

Ganeshotsav 2022 : घरीच बनवा इको फ्रेंडली गणेश मूर्ती

यंदा ३१ ऑगस्टला घरा घरात गणरायाच्या मूर्तीची स्थापना होणार आहे. साधारणपणे लोक बाजारातून गणेशाची मूर्ती आणून तिची स्थापना करतात. पण त्यात केमिकल असतात. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचते. पर्यावरण सुरक्षित तर आपण सुरक्षित राहू. म्हणून तुम्ही इकोफ्रेंडली मूर्ती बनवू शकतात. ही मूर्ती घरी बनवणे सोपे आहे. इथे आम्ही तुम्हाला इकोफ्रेंडली मूर्ती बनवण्याची पध्दत सांगणार आहोत. Ganeshotsav 2022

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : गणपतीला नैवेद्यासाठी तयार करा स्पेशल श्रीखंड, पाहा रेसिपी

मातीचा गणपती कसा बनवावा?

  • चिक्कण माती घ्यावी. यासाठी काळी किंवा लाल माती घेऊन ती ४-५ वेळा नीट चाळून घेत चिक्कण माती करावी. त्यात थोडे पाणी घालून त्याचा गोळा करावा. त्याचे वेगवेगळे तुकडे करावे.

  • या चार तुकड्यांपैकी एक घ्या. त्याला चपटे करून मूर्तीचा बेस तयार करावा. काठ चिकण करण्यासाठी स्केलचा वापर करावा.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : यंदा विघ्नहर्त्यावरही महागाईचे विघ्न!

  • दुसरा तुकडा घेऊन त्याचा गोलगोल आकार करून धड बनवावे. मूर्तीचे शरीर आणि बेस यांना जोडण्यासाठी टूथपिक वापरावी. टूथपिक नसेल तर बेस आणि धड जोडण्यासाठी २-३ थेंब पाणी घालावे.

  • मूर्तीची सोंड, हात, पाय बनवण्यासाठी चार लांब रोल बनवावे. रोलचा पुढचा भाग चपटा करून धडाला चिकटवावा. एक रोल मूर्तीच्या चहूबाजूंनी लावून पायांच्या वरच्या बाजूस लावावे. एका हाताला वरच्या बाजूने चपटे करावे. म्हणजे आशीर्वादाचा हात तयार होईल.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : गणेशोत्सव मंडळांसाठी एक खिडकी योजना, मंडळांना एक तासात परवानगी

  • मूर्तीसाठी हात बनवावा. त्यावर बोटे आणि अंगठा फार काळजीपूर्वक बनवावे. एक गोळा घेऊन त्याला गोलाकार करून शरीराच्या वर लावावे. त्याचे शीर तयार होईल.

  • लांब रोलचा तुकडा घेऊन त्याची सोंड बनवावी. ती चेहऱ्याच्या मधोमध लावावे. सोंडेचे टोक टोकदार करू शकतात.

Web Title: Eco Friendly Ganesh Murti How To Make

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..