सलग दुसऱ्या वर्षी निलगार गणपतीचे दर्शन बंद

तीन राज्यातील भाविकांचा हिरमोड ; व्यापारी वर्गाचे कोट्यवधींचे नुकसान
सलग दुसऱ्या वर्षी निलगार गणपतीचे दर्शन बंद

संकेश्वर : कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील नवसाला पावणाऱया निलगार गणपतीचे दर्शन यंदा सलग दुसऱ्या वर्षी बंद आहे. त्यामुळे लाखो भाविकांची हिरमोड झाली आहे. तसेच येथील व्यापाऱ्यांचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

तीनशे वर्षांचा इतिहास असलेल्या या हेद्दूरशेट्टी परिवाराच्या गणपतीच्या दर्शनाला गत तीस वर्षात गर्दी होताना दिसत आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार गत वर्षांपासून फक्त धार्मिक विधी वगळता सर्व कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. दरवर्षी निलगार गणपतीच्या दर्शनाला भाविक रोज लाखोंच्या संख्येने येतात. त्यामुळे गणेश चतुर्थीपासून 21 दिवस संकेश्वर शहराला दरवर्षी यात्रेचे स्वरूप प्राप्त होत असत.

रिक्षा, हाॅटेल, पानटपरी, किराणा, पेढ्याचे दुकान, नारळ, साखर, कापूर यासह इतर दुकानातूनही रोज कोट्यवधींची उलाढाल होत. यातून अनेकांचा उदरनिर्वाह चालत. पण कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षात गणपतीचे दर्शन बंद असल्याने भक्तांसह व्यापाऱ्यांचाही हिरमोड झाला आहे. कोरोनातून जगाची सुटका होऊ दे आणि पुन्हा एकदा सर्व भक्तांना निलगार गणपतीचे दर्शन घडू देत, अशी प्रार्थना गणेशाकडे भाविक करत आहेत.

निलगार गणपतीचे वैशिष्ट

संकेश्वरचे ग्रामदैवत शंकराचार्य मठाचा आश्रय गणेशोत्सवाला असतो. संपूर्ण लाल रंगातच निलगार गणपतीला रंगविले जाते. विशिष्ट मुहूर्तावर मूर्ति घङविल्यास प्रारंभ होतो. उंची सव्वादोन फुट असते. दरवर्षी मूर्तिकार, रंग, रूप व आकार एकच असतो. उत्सवाच मू्र्तिकारास आहेर व मानपानाची परंपरा आहे.

सलग दुसऱ्या वर्षी निलगार गणपतीचे दर्शन बंद
Paralympics Closing Ceremony : अवनीनं थाटात फडकवला तिरंगा!

संकष्टीनंतरच्या सोमवारी किंवा गुरुवारी विसर्जन

गणेश चतुर्थी झाल्यावर येणाऱ्या संकष्टीनंतर पहिल्या सोमवारी किंवा गुरुवारी निलगार गणपतीचे विसर्जन केले जाते. यावेळी मोठी मिरवणूक निघते. फटाके फोडण्याचा नवस अनेक जण फोडतात. विविध प्रकारच्या वाहनांतून यावेळी भाविक दाखल होतात.

निलगार गणेशोत्सव कालावधीत वीस दिवसात दोन-तीन लाखाची उलाढाल होत. आणलेल्या साहित्याची रक्कम देऊन उरलेल्या वीस-पंचवीस हजारात पुढे दोन-तीन महिने घर चालत. पण गतवर्षांपासून उत्सव बंद झाल्याने आर्थिक अडचणी येत आहेत. आपल्याप्रमाणे ४०० ते ५०० हून अधिक व्यावसायिकांच्या कुटुंबाची ही अवस्था आहे. त्यामुळे उत्सव पूर्ववत व्हावा, याकरिता गणेशाच्या चरणी प्रार्थना करीत आहोत.

-जोतिबा फडके,

नारळ, साखर, कापूर दुकानदार

निलगार गणपतीमुळे संकेश्वर शहराचे नाव तीन राज्यात प्रसिद्ध झाले आहे. सलग 21 दिवस चालणारया या उत्सवामुळे येथील बाजारपेठेतील उलाढाल चांगली होते. अनेकाना रोजगार उपलब्ध होतो. शिवाय प्रतिवर्षी गणेश दर्शनाला येणारे भाविकही दर्शन बंद असल्याने नाराज झाले आहेत. कोरोनाचा अंत होऊन पुन्हा श्री गणेश दर्शन सुरु व्हावे, हीच गणेशाकडे मागणी करीत आहोत.

-दीपक भिसे,

गणेश भक्त, संकेश्वर

एक नजर

  1. निलगार गणपतीला ३०० वर्षांची परंपरा

  2. गणपतीचे 21 दिवसांचे वास्तव्य

  3. नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती

  4. वीस दिवसात बाजारपेठेत २० कोटीवर उलाढाल

  5. उत्सवात ३० लाखाऊन अधिक भाविकांकडून गणेश दर्शन.

  6. आजवर मठाधीश, राजकीय, सामाजिक व चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com