Ganeshotsav 2022 : गणपती बाप्पाच्या आरतीला 'या' रंगाचे कपडे परिधान करा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022

Ganeshotsav 2022 : गणपती बाप्पाच्या आरतीला 'या' रंगाचे कपडे परिधान करा..

हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणेशाच्या आगमनानंतर घराघरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाडक्या बाप्पाला काही कमी पडायला नको यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. बाप्पाही आपल्या सर्व इच्छा पुर्ण करतो, अशी भक्तांची भावना आहे. बाप्पाच्या आरतीला जाताना तुम्ही बाप्पाला आवडणाऱ्या तीन रंगाचे कपडे परिधान करू शकता. कोणते आहेत ते तीन रंग जे गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहेत, याबद्दल जाणून घेऊयात...

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : मानवी शीर असलेले बाप्पाचे जगातील एकमेव मंदिर; श्रीरामांनीही केली होती पूजा

  • गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर काहीजण सत्यनारायण पूजाही घालतात. तूम्ही या पूजेसाठी आणि आरतीसाठी गुलाबी, आकाशी, फिकट पिवळे आणि क्रीम रंगाचे कपडे घालू शकता. कारण हे रंग बाप्पाला अतिशय प्रिय आहेत.

  • पांढरा रंगही पवित्रतेचे आणि शांततेचे प्रतिक मानला जातो. तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडेही घालू शकता. पांढऱ्या रंगात तुम्ही स्वत:ला सिंपल आणि सोबर लुक देऊ शकता.

  • याशिवाय पूजेच्या वेळी तुम्ही लाल रंगाचे कपडे घालू शकता, कारण लाल रंग अतिशय शुभ मानला जातो. लाल रंग गणपती बाप्पालाही प्रिय आहे. तुम्ही या रंगाचे कपडेही परिधान करू शकता.

  • हिरवा रंग देखील गणपती बाप्पाचा आवडता रंग आहे. हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणून तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे घालू शकता.

हेही वाचा: Ganesh Chaturthi 2022 : मुलाचं नाव ठेवताय? मग, गणपतीच्या नावानं ठेवा 'ही' नावं

Web Title: Ganesh Chaturthi 2020 Wear These Favourite Colours Of Lord Ganpati Pooja And Aarti

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..