esakal | 'या' ठिकाणी घेता येईल 'लालबागच्या राजा'चे ऑनलाइन दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

Lalbaugcha Raja

'या' ठिकाणी घेता येईल 'लालबागच्या राजा'चे ऑनलाइन दर्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या 'लालबाग राजा'च्या (lalbaugh raja) दर्शनाची यंदा ऑनलाइन व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनामुळे (corona) मंडपात जाऊन गणरायांचे दर्शन घेण्यावर बंदी घालण्यात आहे. त्यामुळे मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची (online darshan) व्यवस्था केली आहे. 'लालबागचा राजा' दरवर्षी लालबाग मार्केटमध्ये (lalbaugh market) विराजमान होतो. उत्सवाच्या दहा दिवसात देशभरातून कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी इथे येतात.

यामध्ये सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांचा समावेश असतो. पण कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे यंदा ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

हेही वाचा: गणेशोत्सव: मुंबईत १० ते १९ सप्टेंबर दरम्यान कलम १४४ लागू

गणेशचतुर्थीच्या आदल्यादिवसापासून लालबाग राजाच्या दर्शनासाठी मोठी रांग लागलेली असते. मनातील इच्छा पूर्ण झाल्याने अनेक मौल्यवान दागिन्यांसह अनेक वस्तु श्रद्धेने लालबाग राजाच्या चरणी अर्पण केल्या जातात. यंदाच्यावर्षी तुम्हाला 'लालबागच्या राजा'चे ऑनलाइन दर्शन घेता येईल.

हेही वाचा: 'अमेरिका, चीनची स्पर्धा व्हावी पण...' बायडेन-जिनपिंग फोनवर चर्चा

लालबागचा राजाचे ॲानलाईन दर्शन भाविकांसाठी शुक्रवार दि. १० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून ते रविवार दि. १९ सप्टेंबर २०२१ सकाळी ७:०० वाजेपर्यंत २४ तास चालु राहील.

सदर उत्सवाचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत सोशल मीडिया साईटवर उपलब्ध असेल.

मंडळाचे अधिकृत वेबसाइटला भेट द्या:

www.lalbaugcharaja.com

मंडळाचे अधिकृत यूट्यूब चॅनल:

https://youtu.be/Yrfsd3NsGdQ

मंडळाचे अधिकृत फेसबुक पेज:

https://fb.me/e/1k0x7o4iC

मंडळाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट:

https://twitter.com/lalbaugcharaja

मंडळाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट:

https://instagram.com/lalbaugcharaja

मंडळाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट:

https://twitter.com/lalbaugcharaja

मंडळाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट:

https://instagram.com/lalbaugcharaja

#lalbaugcharaja

loading image
go to top