Ganesh Visarjan 2022 : डॉल्बीचा दणदणाट तुमच्या जीवावर बेतू शकतो

गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचायला जाणार असाल तर सावध व्हा. डॉल्बीचा दणदणाट तुमच्या जीवावर बेतू शकतो
Ganesh Visarjan 2022
Ganesh Visarjan 2022 esakal

Dolby : वर्षातून एकदाच अनुभवायला मिळणारी गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी सगळेत फार उत्साही असतात. या मिरवणुकांचा अनुभव घेण्यासाठी राज्यभरातून लोकं खास मुंबई-पुण्याला जातात. याचा थाटच काही निराळा असतो. यात मिरवणुकीत नाचण्याची मजाही काही वेगळीच असते.

Ganesh Visarjan 2022
Ganesh Visarjan 2022: गणपती विसर्जनासाठी थेट गंगेचं पाणी आणलं

पण हल्ली कोणत्या नेत्याची जयंती-पुण्यातिथी असो किंवा सण, डॉल्बीच्या मोठ मोठ्या भिंती उभारून त्याच्या आवाजात थिरकणे फारच कॉमन झाले आहे. यातून गणपती विर्सजन मिरवणूकही वेगळी उरलेली नाही. त्यामुळे जर तुम्ही अशा मिरवणुकीत सलभागी होण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा. हाच डॉल्बीचा दणदणाट तुमच्या जीवावर बेतू शकतो.

Ganesh Visarjan 2022
Pune Ganesh Visarjan 2022 : मुख्य मिरवणुकीसाठी पोलिसांचा बंदोबस्त

डॉल्बीमुळं येऊ शकतो हार्ट अटॅक

डॉल्बीच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळं हार्ट अटॅक येऊ शकतो. डॉल्बीचे कंपनं निर्माण होऊन त्याचा हृदयावर ताण येतो. छातीची धडधड वाढते. गर्दीत श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. अशा घटना अनेकदा घडल्या आहेत.

Ganesh Visarjan 2022
Ganesh Visarjan 2022 : विसर्जन मिरवणुकीवेळी १३ पुलांवर पोलिस बंदोबस्त

डॉल्बी साऊंड सिस्टीम असो, डीजे असो नाहीतर लाऊड स्पीकर. नाचता नाचता हार्ट अटॅक येण्याच्या घटना अलिकडच्या काळात वाढल्यात. बदललेल्या लाईफस्टाईलमुळं अलिकडच्या काळात कधी खेळताना तर कधी नाचता नाचता मृत्यू येण्याच्या घटना वाढल्यात. अगदी तरुणांनाही हार्ट अटॅकचा धोका संभवतो.

Ganesh Visarjan 2022
Ganesh Visarjan 2022 : सकाळी सात वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते...

त्यामुळं गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डॉल्बी, डीजेच्यातालावर बेभान होऊन नाचायची तयारी तुम्ही केली असेल तर सावध व्हा. आपल्या हृदयाची आणि जीवाची काळजी घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com