esakal | Gauri Pujan 2021: घरोघरी गौरींच्या फराळांची दरवळ; आज आगमन, उद्या पूजन
sakal

बोलून बातमी शोधा

Gauri Pujan 2021: घरोघरी गौरींच्या फराळांची दरवळ; आज आगमन

महिलांचा त्रास वाचविण्यासाठी हलवाईही सरसावले असून, शहरात विविध ठिकाणी करंजापासून चकलीपर्यंत आणि बदामी हलव्यापासून म्हैसूरपाकापर्यंतच्या सर्व पदार्थांचे स्टॉल लागले आहेत.

Gauri Pujan 2021: घरोघरी गौरींच्या फराळांची दरवळ; आज आगमन

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा: गणराया पाठोपाठ लक्ष्मीच्या पावलांनी येणारी गौराई संतुष्ट राहावी. तिच्यासाठीच्या फराळात कोठेही कमी राहू नये, यासाठी घरोघरच्या सुगरणी कामाला लागल्या असून, फराळाच्या पदार्थांचा दरवळ सुटू लागला आहे, तसेच महिलांचा त्रास वाचविण्यासाठी हलवाईही सरसावले असून, शहरात विविध ठिकाणी करंजापासून चकलीपर्यंत आणि बदामी हलव्यापासून म्हैसूरपाकापर्यंतच्या सर्व पदार्थांचे स्टॉल लागले आहेत. मात्र, खाद्यतेलाचे दर वाढलेले असल्याने यावर्षी फराळाच्या तयार पदार्थांच्या किमतीतही साधारण २० टक्के वाढ झाली आहे.

हेही वाचा: सातारा: जनावरं चारण्‍यास मनाई केल्याने वनमजुरास मारहाण

गौरींचे आज रविवार (ता. १२) आगमन होणार आहे, तर सोमवारी गौरीपूजन आहे. या दिवशी गौरीपुढे विविध प्रकारचे पदार्थ मांडले जातात. गौरीच्या इतर सजावटीला गोड, तिखट पदार्थांची सुंदर चव देण्याचाही विशेष प्रयत्न केला जातो. हा गौरीसाठीचा फराळ किमान चांगला व्हावा, फराळाच्या मांडणीत भरपूर पदार्थ असावेत यासाठी महिला वर्ग काळजी घेतो. त्यामुळेच घरोघरी पदार्थ तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. अनेक महिलांना सर्व पदार्थ करणे शक्य होत नाही. हे लक्षात घेऊन साताऱ्यातील हलवायांनी मिठाईसह विविध पदार्थांनी आपली दुकाने गच्च भरून ठेवली आहे. मिठाई खरेदीसाठी आजपासूनच महिलांची वर्दळ वाढली आहे.

हेही वाचा: सातारा: जनावरं चारण्‍यास मनाई केल्याने वनमजुरास मारहाण

दरम्यान, विविध प्रकारच्या डाळी, तेल, साखर यांचे दर काही प्रमाणात वाढल्याने पदार्थांच्या दरातही साधारण पाच ते दहा टक्के वाढ झाली आहे. फराळाच्या पदार्थापैकी करंजा, चकल्या, काही प्रकारचे लाडू महिला घरी करतात. मात्र, मिठाई शक्‍यतो घरी कोणीच करत नाही. साताऱ्यात लहान-मोठे मिठाईची दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. शहरात राजपथ, कर्मवीर भाऊराव पाटील पथावर अनेक हलवायांनी आपली दुकाने थाटली आहेत. विविध प्रकारचे लाडू, माहीमचा हलवा, सुतारफणी, बालुशाही, म्हैसूरपाक, फरसाण असे पदार्थ महिला खरेदी करताना आढळतात.

हेही वाचा: सातारा जिल्ह्यात आज महा लसीकरण! दीड लाख डोस उपलब्ध

पदार्थांमध्ये प्रतिकिलो २० ते ४० रुपयांची वाढ

सध्या बुंदीचे लाडू २०० ते २४० रुपये, चकली २८० रुपये, म्हैसूरपाक २४० रुपये किलोने विकला जात आहे. बहुतेक पदार्थांमध्ये प्रतिकिलो २० ते ४० रुपयांची वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

loading image
go to top