esakal | गं पोरी गवरी आली...माहेरवासीण गौरींचे सर्वत्र उत्साहात स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगड शहर व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात गौरीचे आज आगमन झाले.

गं पोरी गवरी आली...माहेरवासीण गौरींचे सर्वत्र उत्साहात स्वागत

sakal_logo
By
अमोल सांबरे

विक्रमगड: गणपतीची आई, शिवाची पत्नी आणि दक्ष राजाची कन्या असलेली गौरी आज घरोघरी विराजमान झाली. माहेरवाशिणीचे प्रतीक समजल्या जाणा-या गौरीची रविवारी महिलांनी मुहूर्तावर नटून-थटून पूजा केलीच पण आजच्या गौरीनाही साजशृगांर तितक्याच उत्साहात केला. दरम्यान, तालुक्यात शहर, गाव-खेडया पाडयासह माहेरवाशीण गौरींचे उत्साहात स्वागत करण्यांत आले.

विक्रमगड शहरासह ग्रामीण भागात रविवारी गौरी गणपती बाप्पासोबत विराजमान झाल्या आहेत. परंपरेनुसार आणि नवसाच्या म्हणून तांब्यांच्या गौरीची सर्वसाधारणः जेष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन गौरीची प्रतिष्ठापना घरांमध्ये केली जाते. पारंपारिक पध्दतीने फुलांच्या खंडयांच्या गौरी बसविल्या जातात. गौरीच्या आकर्षक सोज्वळ, साजि-या छबी आणि मुखवटे भाविक भक्तीभावाने घरी आणले व पारंपारिक पध्दतीने पूजा करण्यांत आली. घरात समृध्दीच्या पावलांनी ये अशी प्रार्थना महिलांनी गौरीकडे केली मंगळवारी 14 सप्टेंबरला गणपती बाप्पासोबत गौरीलाही निरोप दिला जाणार आहे. पण हे तीन दिवस गोरीच्या कौतुकात सगळेच रमणार आहेत.

विक्रमगड शहर व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात गौरीचे आज आगमन झाले.

विक्रमगड शहर व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात गौरीचे आज आगमन झाले.

गौरीला नैवैद्यासाठी शेपूची भाजीसह 16 शाकाहारी भाज्या करण्याची प्रथा आहे. तर गौरीच्या पूजेला पुरणपोळीचा नैवैद्य असतो,काही घरात परंपरेनुसार श्रावण मासांतील शाकाहारी व्रताची सांगता यामुळे होते. विकमगड शहरातील अवंतीका अतुल वाडेकर हया गेली अनेक वर्षापासुन आपल्या कुटुंबाच्या पुर्वजा पासुन चालत आलेल्या रितीरीवाजा प्रमाणे परंपरेनुसार दरवर्षी गौरीचे उत्साहात स्वागत करुन त्याची प्रतिष्ठापणा करण्याची पध्दत आजही तेवढयाच दिमाखित जपतांना दिसत आहे.

हेही वाचा: इको फ्रेंडली बांबूच्या मखरांना गणेशभक्तांची पसंती!

ग्रामीण भागात पाना-फुलांची गौरी

विक्रमगड तालुक्यातील अनेक खेडो-पाड्यात पाना-फुलांची गोरी बसवली जाते. विशेषता कुणबी समाजात गौरीला खुप महत्व आहे. घरातील प्रत्येक भागात पावलाचे ठसाच्या प्रतिकृतीने घरात पावले काढली जातात यातून लक्ष्मी घरात वास करते अशी श्रद्धा आहे.

loading image
go to top