esakal | Ganesh Mahotsav 2021 - गोल्डनबॉय 'नीरज'च्या रुपात बाप्पा; अनोख्या मूर्तीची पंचक्रोशीत चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

गोल्डनबॉय 'नीरज'च्या रुपात बाप्पा; अनोख्या मूर्तीची पंचक्रोशीत चर्चा

संसारे यांनी नीरजच्या रूपातील भालाफेक करताना अत्यंत सुबक मूर्ती साकारली आहे.

गोल्डनबॉय 'नीरज'च्या रुपात बाप्पा; अनोख्या मूर्तीची पंचक्रोशीत चर्चा

sakal_logo
By
- मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकमध्ये भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई करून तो कोट्यवधी भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनला. (Ganesh Chaturthi 2021) त्याच्या कौतुकाचे अनेक प्रकार पहायला मिळत आहेत. आता तर रत्नागिरीतील मूर्तिकार आशिष संसारे यांनी भालाफेकपट्टू नीरजच्या पोझमधील दीड फुटाची गणेशमूर्ती साकारली आहे. (Ganesh Chaturthi) ही मूर्ती मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानी प्रतिष्ठापित केली जाणार आहे. मूर्ती सध्या रत्नागिरीकरांच्या चर्चेचा विषय बनली आहे. (Ganesh Mahotsav 2021)

माजी कुलगुरू डॉ. देशमुख यांची रत्नागिरीशी नाते आहे. ते स्वतः हौशी असल्याने दरवर्षी नवनवीन थीमवर मूर्ती असावी, अशी त्यांची इच्छा असते. (konkan News) यंदा सुवर्णपदक मिळवलेल्या नीरज चोप्राच्या स्वरूपात गणेशमूर्ती साकारण्याची संकल्पना त्यांनी मूर्तिकार आशिष संसारे यांना बोलून दाखवली. त्यानुसार संसारे यांनी नीरजच्या रूपातील भालाफेक करताना अत्यंत सुबक मूर्ती साकारली आहे. (ganesh festival 2021)

हेही वाचा: प्रसंगावधान राखत ग्रामस्थांनी वाचवली हर्णे बंदरातील नौका

डॉ. देशमुख गेली सुमारे १५ वर्षांहून अधिक काळ संसारे यांच्याकडूनच मूर्ती नेत आहेत. याआधी त्यांनी प्रो- कबड्डी सुरू झाल्यावर उंदरांसोबत कबड्डी खेळताना गणपती, झाड लावणारा गणपती अशा वेगवेगळ्या स्वरूपातील गणेशमूर्ती संसारे यांच्याकडून साकारून घेतल्या आहेत. गणेशमूर्तीसाठी ते आरासही तितकीच वैशिष्ट्यपूर्ण करतात.

आशिष संसारे हे रत्नागिरीतील प्रसिद्ध मूर्तिकार असून त्यांचा पिढीजात गणेशमूर्ती कारखाना आहे. त्यांचे आजोबा रघुनाथ सखाराम संसारे यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा त्यांचे वडील अशोक संसारे, काका प्रभाकर संसारे यांनी सुरु ठेवली. आता त्यांचा हा वारसा आशिष संसारे सांभाळत आहेत.

हेही वाचा: एका रात्रीत मच्छीमार लखपती; जाळ्यात सापडली 'घोळ' मासळी

माजी कुलगुरू डॉ. देशमुख यांच्या घरी..

ही गणेशमूर्ती दीड फूड उंच आहे. शाडू मातीतील गणेशमूर्ती असून दोन पायावर तोल सांभाळून भालाफेक करतानाची ही मूर्ती साकारणे निश्चितच आव्हानात्मक होते. माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या मुंबईतील घरी जाण्यासाठी ही गणेशमूर्ती आज ता. ७ रोजी रत्नागिरीतून निघाली. देशमुख यांचे मित्र राहुल औरंगाबादकर यांनी ही जबाबदारी पेलली आहे.

"डॉ. देशमुख आमच्याकडून गेली १५ वर्षे मूर्ती बनवून घेत आहेत. त्यांच्या प्रेमळ आग्रहामुळे यंदाची मूर्ती साकारताना विशेष आनंद झाला. ट्रॅक व फिल्डमध्ये भारतासाठी पहिल्यांदाच सुवर्णपदक विजेत्या नीरजची मूर्ती साकारणे नक्कीच माझ्यासाठीही अभिमानास्पद आहे."

- आशीष संसारे, मूर्तिकार

loading image
go to top