esakal | नाशिकरोड परिसरात १२ ठिकाणी होणार 'श्री'चे विसर्जन
sakal

बोलून बातमी शोधा

विसर्जन

नाशिकरोड परिसरात १२ ठिकाणी होणार 'श्री'चे विसर्जन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिकरोड: नाशिकरोड परिसरात सावर्जनिक गणेश उत्सावाचा रविवारी समारोप होत असून श्री गणरायाला भावपुर्ण निरोप देऊन या उत्सावहाची सांगता होणार आहे, श्री विसर्जनांची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु असुन बारा ठिकाणी गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. कृत्रिम तलाव तयार करण्यात येत आहे.

हेही वाचा: नाशिक: सीए अंतिम परीक्षेत आगम देशात '४६' वा

सालाबाद प्रमाणे नाशिकरोडला सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होता परंतु कोरोनामुळे प्रशासनाच्या जाचक अटी नियमामुळे सावर्जनिक गणेश उत्सव मंडळांची संख्या कमी झालेली आहेत. श्री विसर्जन मिरवणुक काढली जाणार नाही. कोरोना मुळे गर्दी करण्याचे नसल्याने स्वतंत्र गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.

विसजर्न करणाऱ्या मंडळांची व घरघुती गणपतीची सर्वात जास्त गर्दी जेलरोड येथील गोदावरी नदीवर होत आसते. कोरोनामुळे डि.जे व डॉलबी साउंड सिटीम वाजविण्यास न्यायालयाने बंदी घातल्याने गणेश भक्तांचा हिरमोड झाला आहे. श्री विसर्जनांची महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येते आहे. तसेच नदी पात्रात अग्निशमन दलाचे जवान राहणार आहेत.

मिरवणुक मार्गावर खड्डे बुजविण्यात येणार आले आहे. परिसरातील पथदिपची दुरस्ती सुरु आहे. नाशिकरोड परिसरात देवळालीगाव, विहीतगाव, वडनेर येथील वालदेवी नदी, जेलरोड दसक, एकलहरा, गंगावाडी येथील गोदावरी नदी चेहेडी, पळसे येथील दारणा नदी पात्रात गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.

हेही वाचा: नाशिक : ११ वीच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीतही कट-ऑफ ९० टक्क्‍यांवर

तसेच मुक्तीधाम मागे महापालिका शाळा क्रमांक १२५ मैदान, महापालिका नर्सरी जयभवानी रोड, शिखरेवाडी मैदान,गाडेकर मळा आर्टीलरी् सेंटर रोड, नाशिक पुणे महामागार्वरील महापालिका क्रिडांगण, जेलरोड परिसरात नारायण बापु चौक, राज राजेश्‍वरी चौक, या ठिकाणी महापालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत.

सिन्नर फाटा येथे कृत्रिम तलाव व मुर्ती संकलन केंद्र करण्यात यावे आशी मागणी गणेश भकंतांनी केली आहेत. सिन्नर फाटा पासुन दारणा, गोदावरी, वालदेवी यांचे अतंर तीन ते चार किलोमाटर आहेत. सिन्नर फाटा, जुना ओझा रोड, सामनगाव रोड, एकलहरा रोड या परिसरात लोक वस्ती मोठया प्रामणात झाली आसुन येतील नागरिकांना श्री विसर्जनासाठी वालदेवी व दारणा नदीवर तीन किलोमीटर वर जावे लागते जवळ पास मुर्ती् संकलन केंद्र नाहीत तरी सिन्नर फाटा येथे कृत्रिम तलाव करावा आशी मागणी गणेश भक्तांनी केली आहेत.

loading image
go to top