esakal | उरुळी कांचन : गणेश मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात
sakal

बोलून बातमी शोधा

उरुळी कांचन : गणेश मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात

उरुळी कांचन : गणेश मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात

sakal_logo
By
शब्दांकन : जनार्दन दांडगे

उरुळी कांचन : गणरायांच्या आगमनाला अवघ्या दोन दिवसांचा अवधी राहिला असून पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरातील अनेक गणपती कारखान्यांमध्ये गणरायाच्या मुर्ती आकारास येऊ लागल्या आहेत. बाप्पाच्या मूर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यासोबतच मूर्तीचे डोळे, दागिने आदी रंगरंगोटीची कामे सध्या वेगात सुरू असून त्यासाठी दहा ते बारा तास रंगकाम करणारे कामगार झटत आहेत.

गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने नुकतेच उत्सवाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्या अनुषंगाने कारागिरांनीही मूर्ती घडविण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार त्या मूर्तीला रंगकाम करण्याचे काम आत्ता अंतिम टप्प्यात आले आहे.

विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव अवघा काही दिवसांवर आला असून त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी कारखान्यांमध्ये जाऊन मूर्तींचे बुकिंग सुद्धा करून ठेवले आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे कामगार, रंग देण्यासाठी लागणारे कामगारांना चांगली मागणी आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी बुकिंग केलेल्या मूर्तींचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी त्याच्या रंगरंगोटीचे काम करण्यासाठी कामगार दहा ते बारा तास कारखान्यांमध्ये थांबुन काम करीत आहेत. गणपतीच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवणे, मूर्ती वर मोहक रंग चढविणे, गणपतीच्या अंगावरील दागिन्यांवर बारीक कलाकुसर करणे, आदी कामे कामगार करीत आहेत. याशिवाय नगरमधील बहुतांश कारखाने मराठवाड्यासह मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, गुजरात, नागपूर, अशा अनेक ठिकाणी मूर्ती पाठवतात. त्यामुळे वेळेत मूर्ती देता यावी, यासाठी काही कारखान्यांतील मालकांनी नवीन मूर्तींची बुकिंग बंद केली आहे.

हेही वाचा: पारंपरिक गौरींच्या मुखवट्यांना नेहमीच्याच उत्साहात प्रतिसाद!

दरम्यान, यंदाच्या वर्षी रंग, प्लास्टर ऑफ पॅरिस, अशा कच्चा मालाच्या किंमतींमध्ये थोडी वाढ झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत मूर्तींच्या किमतीमध्ये जवळपास दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती ही १०१ रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत मिळत आहेत. राज्य सरकारने नुकतेच उत्सवाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. त्यानुसार प्लास्टर ऑफ पॅरिस व शाडू मातीपासून गणपती बनविले आहेत. त्यातच पी. ओ पी. च्या गणपतीला जास्त मागणी आहे. मंडळाच्या गणपतीला ४ फुटाची मर्यादा असल्याने व मागील वर्षीपासून कोरोनामुळे फटका बसला आहे. परंतु गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी नागरिकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे. तसेच गणपती घ्यायला आल्यानंतर घरातील २ व्यक्तींनीच येण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

हेही वाचा: Hartalika Teej 2021: या पद्धतीने करा हरतालिकेची पूजा

"राज्य सरकारने नुकतेच उत्सवाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. त्यानुसार प्लास्टर ऑफ पॅरिस व शाडू मातीपासून गणपती बनविले आहेत. त्यातच पी. ओ पी. च्या गणपतीला जास्त मागणी आहे. मंडळाच्या गणपतीला ४ फुटाची मर्यादा असल्याने व मागील वर्षीपासून कोरोनामुळे फटका बसला आहे." परंतु गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी नागरिकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे. तसेच गणपती घ्यायला आल्यानंतर घरातील २ व्यक्तींनीच येण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

loading image
go to top