esakal | गणेशमूर्तीच्या उंचीतही पळवाटा; रंगकाम आले हातघाईवर
sakal

बोलून बातमी शोधा

pune

गणेशमूर्तीच्या उंचीतही पळवाटा; रंगकाम आले हातघाईवर

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचे आगमन आता चार दिवसांवर आल्याने गणरायाच्या मूर्तींचे रंगकाम कुंभारवाड्यासह सर्वच गणेशमूर्ती कारखान्यांत हातघाईवर आले आहे. प्रशासनाने चार फुटांपेक्षा मोठ्या मूर्ती करू नयेत, प्रतिष्ठापना करू नये, प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती करू नयेत अशा सूचना दिल्या असल्यातरी काही ठिकाणी कलाकारांनी पळवाट काढून प्रभावळीसह पाच ते सहा फूट उंचीच्या मूर्ती तयार केल्याचे दिसत आहे. (Satara News)

शुक्रवारी (ता. दहा) गणेशाचे आगमन होणार आहे. कोरोनाचे सावट असले, तरी त्यांच्या स्वागताची तयारी जोरात सुरू झाली आहे. घरोघरी रंगरंगोटीसह छोट्या- मोठ्या सजावटीची तयारी सुरू झाली आहे, तसेच घरगुती पूजेच्या मूर्ती पसंती आणि ठरविण्यासाठी नागरिकांची कुंभारवाड्यात वर्दळ वाढू लागली आहे. चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. अनेक कार्यकर्त्यांना मात्र मूर्ती भव्य असल्याशिवाय बरेच वाटत नाही. त्यामुळे काही कलाकारांनी मंडळासाठी मूर्ती करताना पळवाट काढली आहे. मूर्ती चार फुटांची आहे; पण त्याला केलेली प्रभावळ त्यापेक्षाही उंच असल्याने एकूण मूर्ती चार फुटांपेक्षाही उंच असल्याचे आढळते.

हेही वाचा: 'सरकारला लॉकडाऊन बरा वाटतोय', राज ठाकरेंची टीका

दरम्यान, येथील कुंभार कलाकारांनीही या वर्षी पोस्टर कलर वापरण्यावर जास्त भर दिला आहे. पुणे- बंगळूर महामार्गावर बाँबे रेस्टॉरंटनजीक पुलाखाली शेकडो राजस्थानी, उत्तर प्रदेशातील कलाकारांनी आपले कारखाने थाटले आहेत. येथील मूर्ती काहीशा स्वस्त आहेत. त्यामुळे अनेक नागरिक या मूर्ती खरेदी करतात. मात्र, सुबक मूर्तीसाठी कुंभारवाड्यात किंवा स्टॉलवर मूर्ती खरेदी केली जाते. शाडू मातीच्या मूर्तीही काही स्टॉलवर विक्रीस आहेत; पण त्यांच्या किमती तुलनेने जास्त आहेत. काही पर्यावरण प्रेमी भाविक किंमत जास्त असली, तरी अशा शाडूच्या मूर्तींना प्राधान्य देत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

हेही वाचा: नेत्यांच्या सभांना गर्दी चालते, सणांच्या वेळी का नाही?- राज ठाकरे

राजस्थानी कलाकारांच्या मूर्ती स्वस्त

कोरोनाचे सावट, बाजारपेठेतील मंदी, इंधनांचे वाढलेले दर याचा गणेशमूर्तींच्या किमतीवर फारसा परिणाम झालेल्या नाही. सध्या मूर्तींच्या किमती, मूर्तीची उंची, सुबकता, ज्वेलरी काम आणि रंगकामावर ठरत आहेत. एक फुटाची मूर्ती साधारण २०० ते ५०० रुपयांपर्यंत विकल्या जात आहेत. राजस्थानी कलाकारांच्या मूर्ती तुलनेने स्वस्त आहेत.

loading image
go to top