esakal | गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठा हळूहळू पूर्वपदावर
sakal

बोलून बातमी शोधा

गौरी सजावटीच्या साहित्यांनी सजल्या बाजारपेठा

गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठा पुन्हा एकदा फुलली असून बाजारपेठांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. त्यामुळे कोरोनानंतर सर्वकाही पूर्वपदावर आल्याचे दिसून येत आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठा हळूहळू पूर्वपदावर

sakal_logo
By
राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा

केतूर (सोलापूर): गणेश आगमनाचे औचित्य साधत ग्राहक खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी करत आहे. कोरोना महामारीचा संसर्ग कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासन, प्रशासनाने ही कोरोनाचे निर्बंध काहीअंशी कमी आहे. हा पहिलाच उत्सव असल्याने व्यापारी वर्गातही उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठा पुन्हा एकदा फुलली असून बाजारपेठांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. त्यामुळे कोरोनानंतर सर्वकाही पूर्वपदावर आल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी सुरु केली स्वखर्चाने कामे

गेल्या दीड-दोन वर्षांपासून व्यापार, व्यवसाय कधी चालू तर कधी बंद राहिल्याने व्यापारी वर्ग तसेच छोटे व्यवसायिक संकटात सापडले होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने खरेदीची परंपरा कायम असल्याचे दिसून आले. दुचाकी, चारचाकी वाहने त्याचबरोबर सोने, इलेक्ट्रिक वस्तू मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जात होत्या. मागील काही दिवसापासून मंदिरे कुलूपबंद असल्याने फुलांना मागणीच नव्हती, त्यामुळे उत्पादक संकटात सापडले होते. लाडक्या बाप्पासाठी फुलांची आरास, सजावटीसाठी तसेच विविध धार्मिक कार्यक्रमासाठी फुलांना मागणी वाढली. बाप्पा फुल व्यापाऱ्यांना, व्यवसायिकांना पावला असेच म्हणावे लागेल.

हेही वाचा: तांबेरा रोगामुळे पशुधन पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

कोरोनामुळे पूर्णपणे ठप्प झाल्याने व्यापारी पेठेला व तडाखा दिला. गणेशोत्सवामुळे पुन्हा एकदा नवचैतन्य आल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. मंदिरेच बंद असल्याने फुलांना मागणी नव्हती, त्यामुळे फुल उत्पादकांना ती फेकून द्यायची वेळ आली होती, आता मात्र फुलांना मागणी वाढली असून सकारात्मक वातावरण तयार होत असल्याने फुल उत्पादकही खुशीत आहेत.

loading image
go to top