esakal | जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी सुरु केली स्वखर्चाने कामे
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी सुरु केली स्वखर्चाने कामे

या कामांमुळे आगामी निवडणुकीचा राजकीय रंगही येऊ लागला आहे.

जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी सुरु केली स्वखर्चाने कामे

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर): जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी सांगोला तालुक्यातील जवळा जिल्हा परिषदेत गटामध्ये विविध ठिकाणी स्वखर्चातून रस्त्याची कामे सुरू केली आहेत. 'ना टेंडर, ना वर्क ऑर्डर, ना व्हॅल्युएशन...डारेक्ट काम' असे कामांचे स्वरुपच तयार झाले आहे. या कामांमुळे आगामी निवडणुकीचा राजकीय रंगही येऊ लागला आहे.

हेही वाचा: सहाय्यक आयुक्तांवरील हल्ल्याचा निषेध! सांगोला नगरपरिषदेमार्फत आंदोलन

संगेवाडी - ढोलेमळा (शिरभावी) रस्त्याच्या कामाचे उद्घाटन अतुल पवार व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्यावर खड्ड्यांमुळे पावसाळ्यात ये-जा करणे ग्रामस्थांना त्रासदायक होते. शिरभावी, मेटकरवाडी, ढोले मळा व संगेवाडी परिसरातील नागरिकांना या रस्त्यावरून कायमस्वरूपी ये-जा करावी लागत असत. परंतु कोणत्याच योजनेखाली या रस्त्याचे काम होत नसल्याने जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी स्वखर्चातून या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. या रस्त्याचे उद्घाटन शुक्रवारी जि. प. सदस्य अतुल पवार व जेष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. या परिसरातील जे रस्ते नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रासदायक आहेत, अशा रस्त्याचे कामे मी स्वखर्चातून करणार असल्याचेही यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी संगेवाडी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा: सांगोला शहरातील पात्र दिव्यांगांना चार लाखांचे विमा कवच !

कामांबरोबर निवडणुकीचीही चर्चा

जिल्हा परिषद जवळा गटांमध्ये जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी स्वखर्चातून कामे सुरू करण्याचा धडाका सुरु केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे रस्त्यांची कामे ते अग्रक्रमाने करीत आहे. त्यामुळे अनेक गावातील रस्त्याच्या कामाबाबत कोणतेही टेंडर नाही, वर्क ऑर्डर नाही किंवा व्हॅल्युएशन नाही ते डायरेक्ट कामाला सुरवात करीत आहेत. रस्त्याबरोबरच शेतकऱ्यांसाठी वीजेचे पोलही ते स्वखर्चाने बसवून देणार आहेत. या स्वखर्चाच्या त्यांच्या कामामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची चर्चा नागरिकांत जोरदार रंगू लागली आहे.

हेही वाचा: लसीकरणात "सांगोला पॅटर्न' ठरतोय यशस्वी! दहा दिवसांत 33 हजार टेस्टही

आम्हाला काय कामाशी मतलब

सध्या स्वखर्चाने जिल्हा परिषद सदस्य पवार यांनी कामे सुरु केली आहेत. या कामांच्या उद्धाटनाला गावातील विविध पक्षातील नागरीक, कार्यकर्ते उपस्थित असल्याने त्यांना याविषयी विचारले तर ते म्हणाले की, कित्येक वर्षे झाली हा रस्त्याचे काम कोणीही, कोणत्याही योजनेतून केले नाही. आता आम्हाला काय कामाशी मतलब..

loading image
go to top