esakal | चहाच्या कपापासून बाप्पासाठी सजावट: सांबरे कुटूंबीय चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

चहाच्या कपापासून बाप्पासाठी सजावट: सांबरे कुटूंबीय चर्चेत

विक्रमगड तालुक्यातील ओंदे येथील रोशन सांबरे यांच्या कुटुंबीयांनी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साधनाचा उपयोग करून आकर्षक मखर तयार केला आहे.

चहाच्या कपापासून बाप्पासाठी सजावट: सांबरे कुटूंबीय चर्चेत

sakal_logo
By
अमोल सांबरे

विक्रमगड (पालघर): सध्या गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र असून गणपतीच्या सजावटीसाठी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संकल्पना असतात. त्यात वैविध्य नावीन्य आणण्याचा प्रयत्न असतो. त्यात दिवसें दिवस वाढत जाणारी महागाई, जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढल्याने दुसरेकडे कोरोनाचा प्रादुर्भाव अशा दुहेरी पेचामध्ये सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. परंतु येणारा सण साजरा करावा लागतो. त्याप्रमाणे वाढत्या महागाईचा फटका या वर्षी गणपती सणाला देखील बसला आहे. सर्व वस्तूचे भाव अवाच्या सव्वा झाले आहेत. त्यातच महागाईचा भस्मसुर व कोरोनामुळे मोठी भर पडली आहे. त्यामुळे थोडया बजेटमध्ये सण कसे साजरे करायचे असा प्रश्न मध्यमवर्गींयांना पडला आहे.

हेही वाचा: पालघर मध्ये केवडा होतोय दुर्मिळ ; गणेश उत्सवात असते जास्त मागणी

या वर्षी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असल्याने या वर्षी यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत आहे. अशा प्रकारे विक्रमगड तालुक्यातील ओंदे येथील रोशन सांबरे यांच्या कुटुंबीयांनी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साधनाचा उपयोग करून आकर्षक मखर तयार केला आहे. महागाईच्या काळात चहाच्या कपा पासून 500-600 रुपयाच्या खर्चांपर्यंत आकर्षक गणपती मखर तयार करून त्या मध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली आहे.

हेही वाचा: पालघर: अनधिकृत वाळू उत्खननावर कारवाई, वाळू माफियांना दणका

घरातील चहाचे कप एकावर एक रचून केवळ 3-4 तासात आकर्षक मखर तयार केला आहे. हा मखर अत्यंत कल्पकतेमधून तयार करण्यात आला आहे. या सांबरे कुटुंबीयांच्या गणेशोत्सवाला पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, संत तुकाराम महाराज सामाजिक विकास परिषदेचे कार्याध्यक्ष व्ही.जी.पाटील, जिजाऊ संघटनेच्या महिलां सक्षमीकरणाच्या पालघर जिल्हा अध्यक्षा हेमांगीताई पाटील भेट देऊन या महागाईच्या काळात कमी खर्चात आकर्षक मखर साकारल्याने स्तुती केली आहे.

हेही वाचा: पालघर जिल्ह्यासह वसई-विरार पालिकेत आज विक्रमी लसीकरण

गणपतीच्या आरतीचा मान कुटुंबातील लहान मुलींना

अनेक भागात मुलींना किंवा स्त्रियांना देवाच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी प्रवेश बंदी असतो. मात्र सांबरे कुटुंबीयांच्या घरगुती गणेशोत्सव काळात गणपतीची होणारी दोन वेळेच्या आरतीला कुटुंबातील लहान मुलींना मान असतो. या वेळी स्त्री-पुरुष समानता आणि भारतीय संस्कृतीत मुलींचे महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न असतो असे सांबरे कुटुंबीयांनी सांगितले.

हेही वाचा: Sakal Impact: पालघर प्रकरणावर उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांचे चौकशीचे आदेश

दिवसें दिवस वाढत जाणारी महागाई, जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढल्याने दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव अशा दुहेरी पेचामध्ये सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या अशा परिस्थितीत आपले सण व परपंरा अबाधित रहावे, म्हणून कमी बजेट मध्ये गणपती सणाचा उत्साह तोच रहावा, याचा विचार करून 3-4 तासात कमी खर्चात आकर्षक मखर आम्ही तयार केला. हा मखर सर्वांना आवडल्याच्या प्रतिक्रिया आम्हाला येत आहेत.

- रोशन विजय सांबरे, (ओंदे, ता. विक्रमगड)

loading image
go to top