esakal | Video : केळघर ते लंडन.. बाप्पांचा मराठमोळा प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

Video : केळघर ते लंडन.. बाप्पांचा मराठमोळा प्रवास

आपल्या घरापासून लांब असूनही गणेशोत्सवाची परंपरा लंडनमध्ये अनेक महाराष्ट्रातील कुटुंब पार पाडत आहेत. लंडनमध्ये साजरा हाेणारा गणेशोत्सव आजही महाराष्ट्र राज्याच्या परंपरेची साक्ष देत आहे.

Video : केळघर ते लंडन.. बाप्पांचा मराठमोळा प्रवास

sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : खरं तर गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने साजरा करण्यात येणारा प्रमुख सण. शंभर वर्षांपूर्वी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना सर्व जण एकत्र येतील, यातून एकोपा, सामाजिक बंधुता वाढावी हाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला होता. आज १०० वर्ष  झाली कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या मात्र भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सातासमुद्रापार असलेल्या इंग्लंड देशातील लंडनमध्येही पारंपरिक पद्धतीने व उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. केळघर (ता. जावळी) येथील गणेश वसंतराव गाडवे हे नोकरी निमित्त लंडन येथे स्थायिक आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते लंडन येथे मराठमोळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात. दरवर्षी लंडनमध्ये स्थायिक असलेले मराठीजन गणेशोत्सव साजरा करतात. गणेशोत्सव निमित्ताने महाराष्ट्रच्या अनोख्या परंपरेची जगाला ओळख होत असते.

तब्बल एक हजार 22 गावांत एक गाव, एक गणपती पॅटर्न रुजला ; उत्सवाचा खर्च सामाजिक उपक्रमास

यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वत्र गणेशाेत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. लंडनमधील गणेशोत्सव साजरा करायला देखील मर्यादा आल्याचे गणेश गाडवे यांनी ई - सकाळशी बाेलताना सांगितले.

मुस्लिम कुटुंबियांच्या पुढाकाराने कोरोनाबाधित कुटुंबात उत्सवास प्रारंभ 

सोशल डिस्टन्सचा अवलंब करुन यावर्षी लंडनमध्ये बाप्पाचा उत्सव सुरू आहे. मी आणि पत्नी मोनिका दोघेही लंडनमध्ये नोकरी निमित्त स्थायिक झालाे असलाे तरी आपले सण, उत्सव माेठ्या उत्साहात साजरे करताे. आपल्या लाेकांना संस्कृतीचा विसर पडू नये यासाठी येथील सर्व मराठीजण गेल्या दहा वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करताहेत.

भाविकांचे श्रध्दास्थान श्री शंकर पार्वती गणपती (महादेव)

यंदा आम्ही शाडूची गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. प्रसादाचे मोदक, लाडू हे घरीच तयार केले जातात. येथे दुर्वा, खाऊची पाने सहजपणे उपलब्ध होतात. दर वर्षी सर्वजण एकत्रित येऊन देखावे करतात. महिलांसाठी, मुलांसाठी कार्यक्रम असतात. गतवर्षी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्याची प्रतिकृती साकारली हाेती. त्यामध्ये गणपती बाप्पा विराजमान हाेते. याबराेबरच लंडन ब्रिजचा देखावा केला होता.

Video : कोरोनासह जलप्रदूषण टाळण्यासाठी घरच्या घरीच असे करा श्रींचे विसर्जन

आपल्या घरापासून लांब असून देखील उत्सवातील उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला नाही. यंदा काेराेनाचे संकट आल्याने सर्वांनीच अंत्यत साधणेपणाने बाप्पांचा उत्सव साजरा करण्याचा निर्धार केला. गणेश चुतर्थीला बाप्प्पांची प्रतिष्ठापना झाली असून उत्साहात उत्सव सुरु असल्याचे गणेश गाडवे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar