राज्यातील प्रसिद्ध २१ गणपतीपैकी गंगामसला येथील 'मोरेश्वर'

कमलेश जाब्रस
Thursday, 27 August 2020

माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर. 
या ठिकाणास भुस्वानंद क्षेत्र अशी ही आहे ओळख.

बीड : महाराष्ट्रात गणपतीची २१ पुरातन तीर्थक्षेत्र. त्यापैकीच एक बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून राज्यभर एक आगळीवेगळी ओळख आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..

माजलगाव शहरापासून २२ किलोमीटरवर गंगामसला येथील गणेश मंदिर आहे. प्राचीन व ऐतिहासीक वारसा लाभलेले हे मंदिर आहे. या ठिकाणास भुस्वानंद क्षेत्र असे ही म्हणतात. परभणी जिल्हा आणि बीड जिल्हाच्या सीमेवर हे मंदीर आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मोरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. गणपतीची मूर्ती ही पूर्वाभिमुख आहे. गंगामसला हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर आहे. मसला याचा अर्थ हे मंदिर बघितल्यानंतर कळते. मंदिरातील गाभाऱ्यात डाव्या बाजूस भिंतीवर माशाची चित्रे कोरलेली आहेत. कलाकृतीचा उत्तम आविष्कार असलेले हे मंदिर आहे. विशेष म्हणजे हे मंदीर गोदावरी नदीच्या पात्रात मध्यभागी आहे. 
मंदिराला दार नाही. पेशवे कालीन या मंदिराची उभारणी असल्याचे अनेक जाणकार सांगतात. तर गणेश पुराणात देखील या मंदिराचा उल्लेख आहे. मागील अनेक वेळेस या गोदावरी नदीस मोठा पूर आला. परंतु या मंदिराला थोडा ही तडा कधी गेला नाही. या मोरेश्वरला भालचंद्र असेही म्हणतात. स्वयंभू गणेश मंदिर असल्याने हे भाविकांचे श्रद्धा स्थान बनले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भाविक करतात पायी वारी.
प्रत्येक महिन्या मध्ये संकष्टी चतुर्थीला बीड व परभणी जिल्ह्यातील भाविक  नवस पूर्ती म्हणून मोरेश्वर च्या दर्शन साठी पायी वारी करतात.

विकास निधीची गरज
गणेशोत्सव मध्ये दहा दिवस या ठिकाणी वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तर दहा दिवस भाविक दर्शनासाठी येतात. राष्ट्रीय महामार्ग वर हे मंदिर असून या तीर्थ क्षेत्रास आता पर्यंत भरीव असा निधी उपलब्ध झाला नसल्याने बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांच्या निवासाची अडचन होते. शासनाने या तीर्थ क्षेत्रास मोठा निधी उपलब्ध करून द्यावा अशी या भागातील भाविकांची मागणी आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gangamsala Moreshwar famous Ganapati mandir darshan