
Ganesh Chaturthi 2025 : गणेशाचे घरी आगमन, त्याची पूजा, आरती आणि मग प्रसाद या सगळ्यांमध्ये आजचा संपूर्ण दिवस जाणार आहे. तुम्हीही गणेशाचे आगमन थाटात करणार असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.
श्रीगणेश आपल्या भक्तांच्या घरी पाहुणे म्हणून येतात. तुम्ही गणपती बाप्पाला तुमच्या घरी आणत असाल, तर तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक त्यांची प्रतिष्ठापना करावी आणि संपूर्ण मंत्राचा जप करावा. आचार्य पंडित दयानंद शास्त्री श्री गणेशाची स्थापना आणि पूजेशी संबंधित असे काही महत्त्वाचे मंत्र सांगितले आहेत.