Patri Ganesh Puja : गणपतीला प्रिय असणाऱ्या 'पत्री' खरंच आरोग्यदायी असतात? जाणून घ्या महत्त्व

श्री गणेशाच्या पूजेमध्ये पत्रीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
Patri Ganesh Puja
Patri Ganesh Pujaesakal
Updated on
Summary

ज्या पत्री गणपतीला प्रिय असतात त्या आपल्या आरोग्यासाठीही महत्त्वाच्या असतात.

Ganesh Chaturthi 2023 : श्री गणेशाच्या पूजेमध्ये पत्रीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व असून, पूजनात गणपतीला २१ वनस्पती वाहल्या जातात. ज्या पत्री गणपतीला प्रिय असतात त्या आपल्या आरोग्यासाठीही महत्त्वाच्या असतात. गणेश पूजनामध्ये (Patri Ganesh Puja) वापरल्या जाणाऱ्‍या पत्रींचे औषधी गुणधर्म ध्यानी घेतले तर पत्रीमाहात्म्य लक्षात येईल.

Patri Ganesh Puja
GaneshUtsav2023: पेशव्यांपासून ते थेट टिळकांपर्यंत असा आहे गणेश उत्सवाचा इतिहास !
  • पिंपळ : हवा शुद्धीकरणासाठी पिंपळाला विशेष महत्त्व आहे. पिंपळाची लाख अर्थात राख खडीसाखरेबरोबर खाल्यास चांगली झोप लागते. त्यातून, झोपेचे विकार दूर होतात.

  • जाई : तोंड आल्यावर जाईची पानं चाऊन खातात. या उपायाने तोंड लवकर बरं होतं.

  • अर्जुन : हाडे जोडणारी वनस्पती म्हणून या वनस्पतीची ओळख आहे. हृदय रोगावर ही वनस्पती उपयुक्त ठरत असून या वनस्पतीत कॅल्शियमचं प्रमाण खूप असते.

Patri Ganesh Puja
Angaraki Sankashti Chaurthi 2024 : गणेश पुराण नक्की काय आहे? कथा की जीवनसार? जाणून घ्या
  • रुई : हत्तीरोगावर रुईच पान उत्तम औषध मानले जाते. रुई उत्तम कफनाशक औषध असून कुष्ठरोगावर त्याचं औषध प्रभावी ठरते.

  • मारवा : ही वनस्पती सुवासिक असून विविध प्रकारच्या जखमा भरणं किंवा कोणत्याही कारणामुळे त्वचेवर आलेले डाग घालवण्यासाठी उपयुक्त असते.

  • कण्हेरीची पानं : कण्हेरीची पानं, मुळं औषधी आहेत. वात विकारावरील महाविषारी तेलात हिचा वापर केला जातो.

  • देवदार : कफ, पडसे, संधिवात यासाठी देवदार पानांचा रस फायदेशीर ठरतो.

  • डोरली : त्वचा रोग, पोटाचे विकार, मूत्ररोगांवर हे झुडूप फायदेशीर ठरतं.

  • डाळिंब : डाळिंबाच्या पानांचा उपयोग जंतावर गुणकारी असून काविळीवरील उपचारासाठीही त्याचा उपयोग केला जातो.

  • आघाडा : आघाडा मुखरोग आणि दंतरोगावर उत्तम औषध आहे.

Patri Ganesh Puja
Kolhapur Ganeshotsav : गणरायांच्या आगमनालाच दणदणाट; रशियन DJ लिंडाने थिरकवली तरुणाई, रात्री 12 ला पोलिसांनी बंद केल्या सिस्टीम
  • विष्णुकांता : बुद्धीवर्धक म्हणून ही वनस्पती ओळखली जात असून या वनस्पतीचा मानसिक विकारांवर औषध म्हणून उपयोग केला जातो.

  • शमी : त्वचारोग, दमा, मूत्रपिंड या आजारांवर शमी वनस्पती प्रभावी मानली जाते.

  • दुर्वा : गणपतीला दूर्वा प्रिय असून नाकातून रक्त येणं, ताप, अंगातील दाह कमी करण्यासाठी दुर्वांचा रस महत्वपूर्ण ठरतो.

  • तुळस : तुळस ही वनस्पती २४ तास ऑक्सिजन देत असून ती डासांना पळवून लावते. कफ, दमा, सर्दी, किटक दंश तसेच कर्करोग यासारख्या आजारांवर तुळशीचा रस उपयोगी ठरतो.

  • धोतरा : धोतऱ्‍याचे फूल दमा, कफ, संधिवात आदी रोगांवर उपयुक्त ठरतं.

  • बेलपत्र : या वनस्पतीचा उपयोग पोटातील जंतावर गुणकारी आहे. अतिसार, धडधड, उष्णता आदींसाठी हिचा उपयोग होतो.

Patri Ganesh Puja
Satara Ganeshotsav : आनंदमयी पर्वाला दिमाखात सुरुवात; तब्बल दोन लाख 35 हजार 608 गणेशमूर्तींची भक्तिभावाने स्थापना
  • माका : कोणत्याही प्रकारचा रोग न होऊ देण्याची ताकद माका या वनस्पतीमध्ये असून मूत्रपिंडाचा आजार, कावीळ, त्वचारोग, विंचू दंश आदी रोगांवर माक्याचे औषध प्रभावी ठरते.

  • मधुमालती : फुप्फुसाचे विकार, त्वचारोग, सांधेदुखी, पोटातील कृमी कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो.

  • बोर : बोराच्या बियांचं चूर्ण चेहऱ्‍यावर लावल्यास पुटकुळ्या जातात. डोळे जळजळणे, तापामधील दाह यासाठी बोर उपयुक्त ठरते.

  • हादगा : हादग्यांच्या फुलांमध्ये मोठ्याप्रमाणात जीवनसत्वांचा समावेश असून जीवनसत्व ‘अ’ हे दृष्टीला पोषक असते केवडा : ही वनस्पती थायरॉइडच्या दोषावर गुणकारी मानली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.