Ganesh Visarjan 2023 : बाप्पाचं विसर्जन, मोबाईलचोरांची दिवाळी; मिरवणुकीत जाताना अशी घ्या काळजी

Mobile Safety : मोबाईल चोरीला जाऊ नये यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मोबाईल शर्टच्या खिशात, किंवा जीन्सच्या मागच्या खिशात ठेऊ नये.
Ganesh Visarjan 2023
Ganesh Visarjan 2023eSakal

आज सगळीकडे गणेश विसर्जनाची लगबग दिसत आहे. दहा दिवस आपल्या घरी मुक्कामाला असलेल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुका निघतात. या मिरवणुका पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची गर्दी असते. याच गर्दीचा फायदा काही समाजकंटक देखील घेतात. विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीमध्ये मोबाईल चोरांची तर दिवाळीच होत असते. त्यामुळे आपला मोबाईल देखील चोरीला जाऊ नये, यासाठी काही खबरदारी घेणं गरजेचं आहे.

Ganesh Visarjan 2023
Weather Update : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर पाऊसही लावणार हजेरी; आज 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

कुठे ठेवाल मोबाईल?

आपला मोबाईल चोरीला जाऊ नये यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मोबाईल शर्टच्या खिशात, किंवा जीन्सच्या मागच्या खिशात ठेऊ नये. शक्यतो जीन्सच्या समोरच्या खिशात मोबाईल ठेवावा. महिलांनी आपल्या पर्समध्ये मोबाईल ठेवल्यास, ती खांद्यावर न लटकवता हातातच ठेवावी.

लोकेशन ठेवा ऑन

बाहेर जाताना मोबाईलचं लोकेशन ऑन असेल याची खात्री करा. यामुळे तुमचा मोबाईल हरवला, तरी लोकेशन ट्रॅक करून त्याचा शोध घेणं शक्य होतं.

Ganesh Visarjan 2023
Mumbai Ganesh Visarjan 2023 : मुंबईत ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुकीची धूम; मुंबईत वाहतुकीसाठी 'हे' रस्ते बंद

पावती अन् IMEI नंबर

तुमच्या मोबाईल खरेदीची पावती, मोबाईलचा बॉक्स आणि आयएमईआय नंबर या गोष्टी सांभाळून ठेवाव्यात. मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, तर पोलीस या IMEI नंबरच्या मदतीने तुमचा मोबाईल ट्रॅक करू शकतात.

दुचाकीही सांभाळा

केवळ मोबाईलच नाही, तर विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीचा फायदा घेऊन तुमची दुचाकी देखील चोरीला जाऊ शकते. त्यामुळे दुचाकी पार्क करताना सुरक्षित ठिकाणाची निवड करणं गरजेचं आहे. शक्यतो सुरक्षा रक्षक असेल अशा पार्किंग लॉटमध्ये, किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत येईल अशा ठिकाणी दुचाकी पार्क करावी.

Ganesh Visarjan 2023
Ganpati Visarjan Miravnuk : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत तुफान राडा; दोन मंडळांत जोरदार हाणामारीसह दगडफेक, तिघे जखमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com