Ganeshotsav 2023 Puja : गणपती पर्णपत्री - जाणून घ्या विष्णूक्रांत, जाई व मधुमालतीचे औषधी महत्त्व

गणेशपत्रीतल्या विष्णूक्रात, जाई आणि मधुमालतीच्या फुलांचे औषधी महत्त्व
Ganeshotsav 2023 Puja
Ganeshotsav 2023 PujaSakal

- डॉ. कांचनगंगा गंधे, पुणे

- अशोक कुमारसिंग, लखनौ

Ganeshotsav 2023 Puja : वनस्पतीसृष्टी सृष्टीतल्या साऱ्यांना पानांच्या सहकार्याने, सूर्याच्या मदतीने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ‘अन्नदान’ करत असते. हा पर्णसंभार तोलला जातो तो खोडामुळे. प्रत्येक प्रकारच्या वनस्पतीचं खोड वैशिष्ट्यपूर्ण, जोणेकरून सर्व पानांना सूर्यप्रकाश मिळेल. 

छोट्या वनस्पतीचं खोड नाजूक, झुडुपाचं थोडे मोठं व कणखर आणि मोठ्या वृक्षांचा आकार, भव्य व कणखर; तर वेलींचं खोड ताठ न उभं राहणारं, कमकुवत परंतु चिवट. कशाचा तरी आधार घेत सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी धडपडणारं. गणेशपत्रीतल्या विष्णूक्रात, जाई आणि मधुमालतीच्या वेलीचं खोड याच प्रकारातलं.

विष्णूक्रांत

गणपती बुद्धची देवता. बुद्धी तल्लख राखण्यासाठी, मज्जातंतूंची शक्ती वाढवण्यासाठी फक्त पावसाळ्यात उगवणाऱ्या विष्णूक्रांत वेलीचं चूर्ण उपयोगी पडतं. या वेलीचं खोडं तारेसारखं बारीक, जमिनीवर पसरत जातं किंवा आधार घेत वाढतं. 

पानांवर चांदीसारखी लव असते. शांतता, स्थिरचित्तता व प्रसन्नता यांचं द्योतक असलेल्या निळ्या रंगाची फुलं आहेत.

Ganeshotsav 2023 Puja
Ganeshotsav 2023 Puja : बेल, शमीच्या वृक्षाचे आयुर्वेदिक गुणधर्म माहितीयेत का?

मधुमालती

मंद सुवासाच्या, गडद गुलाबी-पांढरट, आकर्षक भरघोस फुलांनी लगडलेल्या 'मधुमालती'चा शोभिवंत वेल कुंपणावर दाट वाढतो. कालिदासाच्या काव्यात 'मधुमालती'चे अनेक उल्लेख आठळतात. मुळांमध्ये असलेल्या 'हिप्टॅजिन' ग्लुकोसाइडमुळे डास, किडे मारण्यासाठीच्या औषधात वापरतात. पानं गुडघ्याच्या सुजेवर व अस्थम्यावर उपयुक्त आहेत.

Ganeshotsav 2023 Puja
Ganeshotsav 2023 Prasad : शास्त्र प्रसादाचे - आरोग्यवर्धक गहुल्याची खीर

जाई

जाईच्या फुलांचा पहाटे येणारा सुवास दिवसभराची ऊर्जा देतो, ते त्याच्यात असलेल्या बेन्झिल अॅसिटेट, बेन्झिल बेन्झोएट आणि इतर रासायनिक घटकांमुळे. फुलाच्या तेलातून जे 'मेथिल जास्मोनेट' काढतात, ते झाडांच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये उपयुक्त आहे.

Ganeshotsav 2023 Puja
Weight Loss Tips दररोज सकाळी या बियांचे प्या पाणी, वजन घटेल व पचनप्रक्रियाही सुधारेल

चरक आणि सुश्रृत संहितांमध्ये जाईचे विविध औषधी उपयोग सांगितले आहेत. जाईचं तेल सांधेदुखीवर आणि त्वचेला मऊपणा आणण्यासाठी उपयुक्त आहे. जखमी बरी होत नसेल तर  जाईची पानं ठेचून लावतात किंवा काढा करून लावतात. हिरड्या घट्ट होण्यासाठी पानं चावून खातात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com