esakal | नवसाला पावणारा राजुरेश्वर गणपती !
sakal

बोलून बातमी शोधा

rajur .jpg

दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थी तसेच अंगारीका चतुर्थी निमीत्ताने भाविकांची मोठी गर्दी होत असते. महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून लाखो भाविक येथे आपला नवस पुर्ण करण्यासाठी राजुरेश्वरास साकडे घालतात.

नवसाला पावणारा राजुरेश्वर गणपती !

sakal_logo
By
ज्ञानेश्वर पुंगळे

राजुर (ता. भोकरदन जि. जालना) : महाराष्ट्रातील साडेतीन पिठापैकी एक संपूर्ण शक्ती पीठ तसेच नाभीस्थान म्हणून प्रसिद्ध तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध तिर्थक्षेत्र राजुर गणपती नावारुपाला आलेले आहेत. दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थी तसेच अंगारीका चतुर्थी निमीत्ताने भाविकांची मोठी गर्दी होत असते. महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून लाखो भाविक येथे आपला नवस पुर्ण करण्यासाठी राजुरेश्वरास साकडे घालतात. काही भाविक पायी चालत दर्शन साठी येतात. वर्षातुन काही वेळा येणार्या अंगारीका विशेष महत्त्व आहे. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

राजुर गणपती महत्त्व 

प्राचीन काळापासून गणेश पुराणात राजुर गणपतीचा उल्लेख आहे. सिंदुरासुर राक्षस ऋषीमुनिंना त्रास देत होता. त्यामुळे त्याचा नायनाट करण्यासाठी वरण्यराजाने राजुरेश्वराचा अवतार घेतला. सिंदुरासुराचा वध केला व त्यांचे अवशेष चारही दिशांना फेकून दिले. त्याचा वध केल्यावर त्याचे अवशेष ज्या ठीकाणी पडले त्या त्या ठिकाणी श्री गणेशाचे साडेतीन पिठे आहेत. त्यापैकीच राजुरेश्वर देवस्थान.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  
हे एक उंच टेकडीवर वसलेले असल्याने दुरुन शोभुन दिसते आहे. महाराष्ट्रातील साडेतीन पिठापैकी एक संपूर्ण शक्ती पीठ तसेच नाभीस्थान म्हणून राजूर गणपती मंदीर नावारुपाला आलेले आहेत. तसेच पुणे येथे चिंचवडला शिर्शस्थान आहे. तर मोरगावला ह्रदयस्थान, तर जळगाव जिल्ह्यात पदमालय येथे पदस्थान असे अडीच पिठे आहेत. त्यापैकी राजुर नाभीस्थान म्हणजेच पोटाचा भाग आहे. व ते संपूर्ण पिठ असल्याचे लौकीक आहे.

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 

राजुरेश्वराचे सन १९८५ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी नानासाहेब पाटील यांनी बांधकामास सुरूवात केली होती. तेव्हा पासून मंदिरला आतापर्यंत सुमारे तीन कोटी रुपयांचा पांढर्या शुभ्र संगमरवरमध्ये बनवलेले राजुरेश्वराचे मंदिर पुर्ण झाले आहे. उंच अशा टेकडीवर मंदिर वसलेले असल्याने दुरुन शोभुन दिसते आहे.

औरंगाबाद : पाच वेळा हरला, पुन्हा जिद्दीने उभा राहिला..अन् विस्तार अधिकाऱ्याचा पोऱ्या कलेक्टर झाला... 

तहसीलदार अध्यक्ष

मंदिराचे अध्यक्ष भोकरदनचे तहसीलदार असुन अकरा विश्वस्त आहेत. आमदार, सरपंच, हे पदसिद्ध विश्वस्त आहेत. जालना शहरापासून सुमारे पंचवीस कि.मी.वर राजुर असुन राजुर परिसरात विदर्भातील देउळगावराजा येथे प्रसिद्ध बालाजी मंदिर पंचवीस किमीवर आहे.

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

पेशव्यांनी नऊ क्विंटलची पंचधातुची घंटा दान केली 
इस.सन. १७२२ मध्ये पेशव्यांनी राजुरेश्वरास नऊ क्विंटलची पंचधातुची घंटा दान केली होती. आजही मंदिरात आहे. त्यामुळे राजुरचे महत्त्व ऐतीहासकालीन असल्याचे सिद्ध होते. या ठिकाणी विठ्ठल महादेव मंदीर शेजारी दिपमाळ आहे. अल्लाउद्दीन खिलजी याने यादवाकडून दौलताबाद किल्ला जिंकला होता. त्यावेळी त्याची नजर राजुर गणपती मंदिरात असलेल्या उंच दिपमाळ वर पडली. व त्याने आपल्या सैन्याला राजुर मंदिरावर आक्रमण करायला सांगितले व नासधूस केली. ती दिपमाळ अजूनही उभी आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात येथे सात दिवस अखंड हरीनाम सप्ताहाद्वारे राजुरेश्वराचा जन्मोत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते.

(संपादन-प्रताप अवचार)
 

loading image
go to top