Ganesh Festival 2023 : गणेशाचे वाहन नक्की कोणते?

गणपतीचे वाहन उंदीर अर्थात‌ मूषक आहे; एवढेच आपल्याला माहिती असते.
ganesh
ganeshsakal

पुराणात वर्णन केलेल्या सर्व देवी देवतांचा विचार केल्यास प्रत्येक देवता कोणत्यातरी वाहनावर आरूढ असलेली दिसून येते. उदा. शंकर नंदीवर, कार्तिकस्वामी मोरावर, गणपती उंदरावर आदी. गणपतीचे वाहन उंदीर अर्थात‌ मूषक आहे; एवढेच आपल्याला माहिती असते. परंतु, चार युगे जी कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुग अशी सांगितलेली आहेत, त्या प्रत्येक युगात गणेशाचे वाहन वेगवेगळे असल्याचे गणेशपुराण सांगते.

सिंहारूढो दशभुज: कृते नाम्ना विनायक:। त्रेतायुगे बर्हिरूढ: षड्भुजोप्यर्जुनच्छवि:॥द्वापरे रक्तवर्णोऽसावाखुरूढश्चतुर्भुज:। कलौ तु धूम्रवर्र्णेोऽसावश्वारूढो द्विहस्तवान्‌॥कृतयुगात गणेशाचे वाहन सिंह असून ते दशभुज अर्थात दहा हात असलेले होते आणि त्यांचे नाव विनायक असे होते.

त्रेतायुगात मयूर वाहन असून सहा हात असलेले असे गणेशाचे रूप होते. त्रेतायुगातील अवताराचे नाव मयूरेश्वर असे होते. द्वापारयुगात मूषक अर्थात उंदीर वाहन असून चार हात असलेला गजानन नावाचा अवतार झाला. कलियुगात घोडा हे वाहन असून दोन हात असलेला अवतार आहे आणि या अवताराचे नाव धूम्रकेतु असे आहे. या देवतांच्या वाहनांमागे काय रहस्य दडलेले आहे?

ganesh
Ganesh Chaturthi 2023: शाहरुख, सलमाननंतर आमिर खानही गणपती दर्शनासाठी पोहचला वर्षा बंगल्यावर!

सामान्यतः गणपतीचे वाहन मूषक म्हणजे उंदीरच का मानले जाते?

‘मूषक’ शब्दाचा विचार केल्यास हा शब्द ‘मूष स्तेये’ या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. या धातूचा संस्कृतमध्ये अर्थ ‘चोरी करणे’ असा आहे. मूषक अर्थात‌ उंदीर ज्याप्रमाणे सर्व वस्तुंची चोरी करतो परंतु पुण्य-पापाने बद्ध होत नाही, त्याप्रमाणे सर्व अंतर्यामी परमात्मा सर्व भोग भोगत असून सुद्धा पुण्य-पापाने बद्ध होत नाही, असा त्याचा गूढार्थ आहे. त्याचप्रमाणे मूषकावर आरूढ असलेले गणपती देव हे मूषकस्वरूपी दुष्ट प्रवृत्तींचे दमन करत आहेत, असाही सांकेतिक अर्थ व्यक्त होतो. म्हणूनच ‘ईश्वर: सर्वभोक्ता च चोरवत्तत्र संस्थित:। स एव मूषक: प्रोक्तो मनुजानां प्रचालक:॥’ असे म्हटलेले आहे.

ganesh
Ganesh Utsav 2023 : पंढरीमध्ये शालेय साहित्याचा वापर करीत इकोफ्रेंडली सजावट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com