Ganeshotsav 2025: टिळकांनी सुरुवात करण्यापूर्वीच महाराष्ट्रातील 'या' भागात सुरू झाला होता गणेशोत्सव!

Maharashtra Ganesh Festival : लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वीच महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये गणपतीची परंपरा सुरू झाली होती. पण कुठं? तुम्हाला माहित आहे का?
Ganeshotsav 2025: Nandurbar Ganpati Tradition Before Lokmanya Tilak
Ganeshotsav 2025: Nandurbar Ganpati Tradition Before Lokmanya Tilakesakal
Updated on

Did you know Ganeshotsav started in Nandurbar before Lokmanya Tilak’s public festival in 1893 : गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला हे तर आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. स्वातंत्र्य चळवळीच्या काळापासून या गणेशोत्सवाला सुरुवात झाली, लोक एकत्र येऊ लागले. पण तुम्हाला माहित आहे का? लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वीच महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये गणपतीची परंपरा सुरू झाली होती.

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वीच नंदुरबारमध्ये मानाचे दोन गणपती बसवण्याची परंपरा आहे. हे दोन्ही गणपती जवळपास १३९ वर्षे जुने आहेत. श्रीमंत दादा आणि श्रीमंत बाबा गणपती अशी या दोघांची नावे आहेत. एवढंच नव्हे तर या भागात मानाचे भाऊ, तात्या, काका, असेही गणपती बसवले जातात.

Ganeshotsav 2025: Nandurbar Ganpati Tradition Before Lokmanya Tilak
Ganeshotsav 2025 : कृष्णातीरावरचा गणपती, एका दगडातली मूर्ती अन् मत्स्याकार मंदिर; गणेशोत्सवात 'इथे' जायलाच हवं!

श्रीमंत दादा गणपतीची स्थापना सन १८८२ ला करण्यात आली. त्यानंतर एका वर्षाने १८८३ मध्ये श्रीमंत बाबा गणपतीची स्थापना करण्यात आली. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव १८९३ मध्ये सुरू केला. त्याच्या ११ वर्षे आधीच हे दोन गणपती नंदुरबारमध्ये स्थापन कऱण्यात आले होते.

Ganeshotsav 2025: Nandurbar Ganpati Tradition Before Lokmanya Tilak
Nashik Ganeshotsav 2023: मौल्यवान गणपतीसाठी कडेकोट सुरक्षा! आयुक्तांकडून सुरक्षिततेबाबत तंबी

या दोन्ही गणपतींचं वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही गणपतींची मूर्ती रथावरच तयार केली हाते. या दोन्ही मूर्ती काळ्या मातीपासून तयार केल्या जातात. गणेशोत्सवाच्या आधी रथावर काळी माती टाकून मंडळाचे कार्यकर्ते कोणत्याही साच्याशिवाय या मातीला आकार देतात. दरवर्षी हा आकार सारखाच असते, हे या गणपतींचं आणखी एक वैशिष्ट्य. गणपतीला आकार दिल्यानंतर या गणपतीला आकर्षक रंग दिले जातात. त्यानंतर त्यांच्यावर आभूषणे चढवली जातात.

नवसाला पावणारे अशी या दोन्ही गणपतींची ओळख आहे. त्यामुळे दरवर्षी श्रीमंत दादा आणि श्रीमंत बाबा गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. या गणपतींचं आणखी एक आकर्षण म्हणजे हरिहर भेट. ही परंपराही दोन्ही गणपतींच्या स्थापनेपासून कायम आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दोन्ही गणपतींची मिरवणूक निघते.

दोन्ही गणपतीच्या मिरवणुका जळका बाजार चौकामध्ये एकत्र येतात. रात्री ९ च्या सुमारास दोन्ही गणपती समोरासमोर येतात. यावेळी गुलाल उधळला जातो. जल्लोष केला जातो. दोन्ही गणपतींची आरती होते आणि त्यानंतर मिरवणुका पुढे निघून जातात. विसर्जन मिरवणुकांमध्येही सर्वात पुढे दादा गणपती त्यानंतर बाबा गणपती आणि त्यानंतर इतर मानाचे गणपती असा क्रम असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com