Ganapati Visarjan 2022: गणपती विसर्जन घरीच करणार आहात? 'या' गोष्टी कटाक्षाने पाळा

भांड्यात इतकं पाणी टाका की त्यात बाप्पाची मूर्ती पूर्णपणे बुडेल.
Ganapati Visarjan 2022
Ganapati Visarjan 2022 Esakal

गणपती विसर्जन २०२२ : यावर्षी ३१ ऑगस्टपासून सुरू झालेला गणेश उत्सवाचा शेवट ०९ सप्टेंबरला होणार आहे. हिंदू धर्मात गणेशोत्सवाला खूप महत्त्व आहे. गणेश उत्सव हा १० दिवसांचा असतो. १० दिवस भक्तांसोबत राहून बाप्पा आपल्या निवासस्थानी परततात, असे म्हटले जाते. गणपती विसर्जनाच्या वेळी भाविक बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा यावेत अशी प्रार्थना करतात. यादरम्यान कोणी एक दिवस, कोणी तीन दिवस, कोणी पाच दिवस तर कोणी संपूर्ण अकरा दिवस आपल्या घरी किंवा पंडालमध्ये बाप्पाची स्थापना केली जाते. त्यानंतर विसर्जन करावे. गणपती बाप्पाचे विसर्जन नदी, तलाव, समुद्र इत्यादीमध्ये केले जाते. मात्र वातावरण लक्षात घेऊन गणपती विसर्जन घरीच करावे, असा सल्ला लोकांना दिला जातो. अशा वेळी जर तुम्हालाही गणपती बाप्पाचे विसर्जन घरी करायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Ganapati Visarjan 2022
Ganeshotsav 2022: मिल्क पावडरपासून बनवा घरच्या घरी फक्त 15 मिनिटात चवदार पेढा

अशा प्रकारे करा बाप्पाचे विसर्जन

● गणपती विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन मूर्तीसमोर उभे राहून फुले, दिवे, अगरबत्ती, मोदक, लाडू व इतर अन्नदान करून शेवटची पूजा करावी. आरती आणि हवन केल्यानंतर पूर्ण विधीपूर्वक गणपतीचे विसर्जन केले जाते.

● गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी सर्वप्रथम स्वच्छ व मोठ्या भांड्यात पाणी भरावे. या पाण्यात थोडे गंगेचे पाणी घाला. भांड्यात इतकं पाणी टाका की त्यात बाप्पाची मूर्ती पूर्णपणे बुडेल.

Ganapati Visarjan 2022
Ganeshotsav 2022 : गणेशाच्या परीक्षेतून तिला मिळाला आशिर्वाद

● बाप्पाचे विसर्जन करण्यापूर्वी त्याची पूजा करा. त्याला ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करा. आरती आणि हवनानंतर त्यात वापरलेल्या वस्तू एका पिशवीत काढून त्या निर्माल्यामध्ये टाकावे आणि गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करावे.

● यानंतर गणेशाची मूर्ती जयजयकार करत उचला आणि ज्या भांड्यात तुम्ही पाणी भरले आहे त्यात हळूहळू त्यांची मूर्ती घाला. ते एकाच वेळी सोडू नका अन्यथा ते तुटू शकते.

● गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर त्याचे पाणी इकडे-तिकडे टाकू नका, त्यावर कोणाचा पायही पडू देऊ नका. तुम्ही ते एका भांड्यात किंवा कोणत्याही पवित्र झाडाखाली किंवा शमी किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com